Radhakrishna Vikhe Patil | Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi News: थोरात, आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नका; विखेंनी सुनावलं, काँग्रेसच्या विरोधात तुम्ही...

Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat : ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये...

Mangesh Mahale

Shirdi Political News : पक्ष बदलावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी टीका केली होती. थोरात यांच्याच संगमनेर मतदारसंघात जाऊन विखे पाटलांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये, काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांनी आम्हाला पक्ष निष्ठेविषयी ज्ञान देऊ नये, असा टोला विखेंनी थोरातांना लगावला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या वेळी शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर टीकास्त्र डागलं.

'आमच्यावर पक्ष बदलण्याची टीका काँग्रेसचे मित्र करीत आहेत, पण आम्ही जे करतो ते डंके की चोट पर जाहीरपणे करतो. 1985 मध्ये बाळासाहेब विखे काँग्रेसकडून खासदार म्हणून उभे असताना तुम्ही तुमच्या मेहुण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे काम केलं. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शकुंतला थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करत घोडा चिन्ह घेतलं आणि तुम्ही काँग्रेसच्या विरोधात काम केले. तुमचे मेहुणे (डॉ. सुधीर तांबे ) नाशिक पदवीधरमध्ये उभे राहिले त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणलं,' असा आरोप विखे पाटलांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"त्यांचे भाचे (सत्यजित तांबे) नाशिक पदवीधर निवडणुकीत उभे राहिले, आम्ही त्यांना निवडून आणलं. तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार होता आणि तुम्ही हात बांधून बसले होते. त्यावेळी मी काँग्रेसचा निष्ठावान सैनिक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्या हे का नाही सांगितलं ? कोणत्या पक्षनिष्ठेच्या ते गप्पा मारता," अशा शब्दांत विखेंनी थोरातांना सुनावलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT