Lok Sabha Elections 2024: निवडणुकीत कायद्याची काठी वाजणारच! एक कॅमेरा गावासाठी...

Nagar Police News: नव्याने आठ पोलिस ठाणे निर्माण होणार...
Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी लोकसभा निवडणुकीसह आगामी वर्षभर होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेसाठी कायद्याची काठी वाजणारच, असा इशारा दिला आहे.

यासाठी अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात स्पशेल ड्राइव्ह, एमपीडीए, हद्दपार, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीमार्फत ४२ चारचाकी वाहने आणि ६३ दुचाकी उपलब्ध होणार असून, त्याचे आज वितरण होणार आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथम नगरला त्यांनी भेट दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक ज्ञानेश्वर ढिकले आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Elections 2024
YS Sharmila Reddy: नजरकैदेच्या भीतीने मुख्यमंत्र्यांची बहीण वाय. एस. शर्मिला रेड्डींनी पक्ष कार्यालयात रात्र काढली!

नगर पोलिस दलास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दत्तात्रय कराळे यांनी देत, गावठी पिस्तुलाचा वापर रोखण्यासाठी जिल्ह्यात स्पेशल ड्राइव्ह घेणार आहे. गावठी पिस्तुले बहुतांश परराज्यातून येतात. मध्य प्रदेश हे गावठी पिस्तूल उत्पादनाचे केंद्र आहे.

यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील जिल्हा पोलिस अधीक्षकांची आढावा बैठक घेऊन कारवाईसाठी स्पेशल ड्राइव्ह घेतला जाईल. नगर जिल्हा भौगोलिक क्षेत्र सर्वाधिक असून, लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण, भौगोलिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र मोठी आहे.

यामुळे सरकारकडे पोलिस संख्याबळात ५०० पद वाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. नव्याने आठ पोलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पूर्वीच पाठवल्याचे दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी १९३० ही अॉनलाइन कॉल प्रणाली सावकाश झाली आहे. त्यामुळे तक्रारी लगेच दाखल होण्यास अडचणी येतात. यावर ती प्रणाली अपडेट करण्याची सूचना दिल्या जातील. पोलिस दलासाठी सीसीटीएनएस प्रणाली दहा वर्षांपूर्वीची झाली आहे. ही प्रणाली कालबाह्य झाली असून, ती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.

प्रणालीचे अद्ययावतीकरण होताच, पोलिस दलाच्या आॅनलाइन कामकाजात अधिक वेग येणार आहे. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिसांना आजूबाजूला घडत असलेल्या गुन्ह्यांबाबत पूर्वकल्पना देण्याबरोबरच, 'एक कॅमेरा माझ्यासाठी आणि एक कॅमेरा गावासाठी हा उपक्रम राबवा', असे आवाहन दत्तात्रय कराळे यांनी केले.

पोलिस दलास ४२ वाहने मिळणार

जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीमार्फत ४२ चारचाकी वाहने, ६३ दुचाकी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचे वितरण आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थित पोलिस मुख्यालयातील मैदानावर होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमधील ही वाहने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

R

Lok Sabha Elections 2024
Yugendra Pawar: आजोबा सांगतील तेच धोरण म्हणणारे युगेंद्र पवार आहेत कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com