Amrishbhai Patel
Amrishbhai Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirpur Milk Association: दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार अमरिशभाई पटेल

Sampat Devgire

Shirpur News: (Dhule) येथील तालुका (Shirpur) दूध (Milk) उत्पादक व कृषिपूरक उद्योगसंघाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवडणूक झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी भाजपचे (BJP) मदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) तर उपाध्यक्षपदी किरण यशवंत दलाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (MLA Amrishbhai Patel elected unopposed President of Shirpur Milk Association)

शिरपुर तालुक्यातील तालुका दूध संघाची ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. ती भाजपचे आमदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक बिनविरोध झाली. यामध्ये सर्व पक्षीय नेत्यांना संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे.

दूध उत्पादक संघाच्या संचालकपदाच्या १५ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. विहित मुदतीत सर्वसाधारण, महिला राखीव आणि इतर मागास प्रवर्गासाठी निवडून द्यावयाच्या संख्येत अर्ज दाखल झाले. माघारी अंतीही दाखल अर्ज कायम राहिले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.

पाठोपाठ अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी संचालकांची विशेष सभा घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदासाठी अमरिशभाई पटेल तर उपाध्यक्षपदासाठी किरण दलाल यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने उभयतांची बिनविरोध निवड झाली.

नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक असे : अध्यक्ष अमरिशभाई पटेल (सर्वसाधारण मतदारसंघ), उपाध्यक्ष किरण दलाल (सर्वसाधारण मतदारसंघ), संचालक (सर्वसाधारण) रघू भरवाड, माधवराव पाटील, दिलीप पटेल, जयपाल परदेशी, नारायण चौधरी, दिलीप पाटील, गयबू पाटील, मधुकर देशमुख. महिला संचालक : विठाबाई पाटील, चंद्रकलाबाई जमादार, इतर मागास प्रवर्ग संचालक मोहन सोनवणे. या निवडणुकीत संघाच्या अनुसूचित जाती-जमाती व विमुक्त जाती-भटक्या जमाती या दोन्ही राखीव मतदारसंघासाठी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने तेथील जागा रिक्त राहिल्या आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून विजय गरुड यांनी काम पाहिले. त्यांना व्यवस्थापक पटेल यांनी मदत केली.

संघ ऊर्जितावस्थेत आणू

आमदार अमरिशभाई पटेल यांनी दीर्घ कालावधीनंतर एखाद्या सहकारी संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. एकेकाळी मोठे दूधसंकलन, प्रक्रिया आणि पूरक उद्योगामुळे समृद्ध मानला जाणारा दूध उत्पादक संघ काही वर्षापासून अडचणीत सापडला आहे. त्याचा परिणाम दूधसंकलनावर झाला आहे. अमरिशभाईंनी धुरा स्वीकारल्यामुळे दूध संघाला नवी झळाळी लाभून तो ऊर्जितावस्थेत येईल अशी अपेक्षा दुग्ध व्यावसायिकांना लागून आहे.

शेतीव्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याशिवाय पर्याय नाही. दुधाची मागणी टिकून आहे. सध्या दुधाला चांगला दरही मिळतो आहे. अशा वेळी अमरिशभाईंसारख्या दिग्गजांकडे या प्रकल्पाची धुरा सोपवल्याने सर्वदूर सकारात्मक संदेश पोचण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्रातील अमरिशभाई पटेल यांचे ज्ञान, अनुभव यांचा लाभ दूध संघाला निश्चितच मिळणार आहे.

-किरण दलाल, उपाध्यक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT