Amol Khatal Sangamner Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner politics news : 'स्थानिक'ची उमेदवारी अशी फायनल होणार; खताळांकडून 'गनिमी काव्या'ची तयारी

Shiv Sena MLA Amol Khatal Reviews Sangamner Local Body Election Prep : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या धांदरफळ गटाची बैठक आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थित झाली.

Pradeep Pendhare

Amol Khatal Sangamner meeting : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संगमनेर तालुक्यात भगवा फडकावयचा आहे. यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कार्यकर्त्यांना तयारी लागण्याचा आदेश दिला. कार्यकर्यांच्या या निवडणुकीत काम करणाऱ्यांना संधी असणार आहे.

परंतु उमेदवारी निश्चिच करताना, भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर नेत्यांशी चर्चा करूनच ठरवली जाईल, असे आमदार खताळ यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी खोट्या गुन्ह्यांत लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत राजकारण खालच्या पातलीवर गेले असून, विरोधकांनी जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे, अशी टीका केली आमदार खताळ यांनी केली.

जिल्हा परिषद (Zilla Parishad) पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या धांदरफळ गटाची बैठक आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थित झाली. सांगवी इथल्या रस्ते कामाचा आणि धांदरफळ खुर्द इथल्या नागेश्वर मंदिर सुशोभिकरण कामाचा प्रारंभ झाला. आमदार खताळ यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून ज्याप्रमाणे मला विजय केले, त्याचपद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही सर्वांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा, असे आवाहन केले.

आमदार खताळ म्हणाले, "विधानसभा निवडणुकीमध्ये (Election) गनिमी काव्याने तालुक्यात 40 वर्षांची प्रस्थापितांची सत्ता उलथावून टाकत परिवर्तन केले, तसेच परिवर्तन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुद्धा करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून आतापासूनच कामाला लागा."

"जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गटाच्या रचना बदलल्या असल्या तरी कार्यकर्ते तेच आहेत, विधानसभेची निवडणूक नेत्यांची होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. जशा सर्वांनी विधानसभेसाठी तन-मन-धनाने काम केले. तसेच काम पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून विकास करायचा आहे," असेही आमदार खताळ यांनी म्हटले.

केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, या त्रिमूर्तींबरोबरच संगमनेर तालुक्याचे पालकत्व घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी या तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिवंत ठेवले. संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण, चारीचे काम यांसारख्या मोठ्या प्रकल्पांना महायुती सरकारने गती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार कोण असेल, हे पालकमंत्री विखे पाटील आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करून ठरवले जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांनी तयारी करावी. ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या अडचणींवर डिसेंबरमध्ये लक्ष घालणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहून, त्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी आपसातील कट-तट बाजूला सारून आमदार अमोल खताळ यांना ताकद द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT