MP Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut: श्रीरामाचे नाव घेता अन् रावणाचे राज्य करता; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Jadhav

Nashik News: श्री रामाची पूजा करतात आणि रावणाचे राज्य सुरू आहे. सत्ताधारी सत्य वचनी असते तर तसे वागले नसते. जनतेच्या न्यायालयात त्यांचे मुखवटे समोर आले आणि त्यांचा तिळपापड झाला. सुरज चव्हाण यांना अटक झाली. मात्र या प्रकरणातील खरे गुन्हेगार शिंदे गटात असून वर्षा बंगल्यवर बसल्याची टीका संजय राऊत यांनी केली. शिवसेना अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राऊत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये पार पडणार असून, त्याच्या तयारीसाठी राऊत नाशिकमध्ये आले आहेत. थोडं उशिरा आलो, आधी यायला पाहिजे होते. पण नाशिकची टीम चांगली आहे. त्यांनी काम पुढे नेले. 22 तारखेला उद्धव ठाकरे नाशिकला येतील. त्यानंतर सावरकर स्मारकाला जातील.

प्रधानमंत्री नाशिकला आले पण त्यांना सावरकरांचे स्मरण झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही. दादासाहेब गायकवाडांची आठवण मोदींनी काढली नाही. पण आम्हाला विस्मरण होणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरून राऊत यांनी टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले, काळाराम मंदिरात ठाकरे दर्शन घेतील. यानंतर रामकुंडावर गोदाआरती होईल. 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता अधिवेशनला सुरूवात होईल. संध्याकाळी खुले अधिवेशन होईल, तर 7 वाजता अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेली एक निमंत्रण पत्रिका व्हायरल झाली असून, त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, हा नतद्रष्टपणा आहे. नट्यांना पत्रिका आली. प्रभू श्रीराम त्यांना शाप दिल्याशिवाय राहणार नाही. आयोध्यातील हा राजकीय सोहळा शेवटचा आहे. 2024 मध्ये जनतेचे आशीर्वाद त्यांना मिळणार नाहीत, अशी सडकून टीका राऊत यांनी केली.

बाळासाहेबांचे नाशिकवर विशेष प्रेम

नाशिकच्या अधिवेशनाची सुरूवात बाळासाहेबांना अभिवादनाने होईल. बाळासाहेबांचे नाशिकवर विशेष प्रेम राहिले. 22 तारखेला आयोध्येत प्राणप्रतिष्ठेचा जो सोहळा होतोय ही बाळासाहेबांचीच इच्छा आहे. त्या लढ्यात आमचे सर्वांचे योगदान होते. नाशिकच्या भूमीत संपूर्ण रामायण घडले. त्यामुळे आम्ही काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असल्याचे राऊत म्हणाले.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT