Nashik Politcs : नाशिकमधील शिवसेना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यात बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र नाशिकमधील बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे हे गैरहजर होते. गोडसेंनी या बैठकीला पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा सोमवार (दि. १८) नाशिकमधून सुरु झाला. नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्यासह पक्षाचे सर्व महत्वाचे नेते व पदाधिकारी देखील बैठकीला उपस्थित होते. पक्षाची ही राज्यव्यापी पहिलीच बैठक होती. या महत्वाच्या बैठकीला पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे अनुपस्थितीत राहिल्याने पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन कसे मजबूत केले जाईल याबाबत बैठकीत मंथन करण्यात आलं. पक्षाची ताकद कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे व ती कशी वाढवता येईल यावर चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात देखील बैठकीत आढावा घेतला गेला. मात्र या बैठकीला नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारल्याचं बघायला मिळालं.
दरम्यान, पक्षाच्या नव्या कार्यकारिणीत गोडसेंना संधी न दिल्याने गोडसे नाराज असल्याचं बोललं जात आहे. नाशिकचे संपर्कमंत्री म्हणून उदय सामंत यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनीही नाशिकमध्ये बैठक घेतली होती. त्याबैठकीवेळीही गोडसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या होणाऱ्या बैठकांना उपस्थितीत लावल्यात गोडसे टाळाटाळ करताना दिसत आहे. त्यात आज खासदार श्रीकांत शिंदे स्वत:नाशिकमध्ये आले असतानाही गोडसे बैठकीला दिसले नाही. त्यामुळे गोडसे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.