Eknath Shinde News: महापालिका हुकली, आता ZP जिंकणारच; शिंदेंची राज्यभर जोरदार मोर्चेबांधणी

Eknath Shinde Begins Maharashtra Tour for ZP Elections : महापालिका राजकारणातील अपयशानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रभर दौऱ्याला सुरुवात केली आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Zilla Parishad elections: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसली असून महापालिका निवडणुकांतील अपयशाची सल भरून काढण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने राज्यभर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुती सरकारमध्ये सहभागी असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसमोर अपेक्षित कामगिरी करता न आल्याने शिंदे गटात अस्वस्थता वाढली होती. आता हीच नाराजी ताकदीत बदलण्यासाठी शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.

महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्हा वगळता राज्यातील इतर भागांत शिंदे गटाला मोठे यश मिळाले नाही. भाजपने अनेक ठिकाणी वरचष्मा राखल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाला राजकीय धक्का बसला होता. याबाबतची खंत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खासगी चर्चांमध्ये व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई मानल्या जात आहेत.

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आधीच राज्यभर रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटानेही स्वतंत्र ताकद दाखवण्याचा निर्धार केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व टिकविल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

Eknath Shinde News
Sharad Pawar: PM मोदींच्या आवाहनानंतर शरद पवारांची पोस्ट! .....ही बातमी चिंताजनक!

पक्षाने राज्यभर जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली असून अनेक पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मंत्र्यांच्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्येही मोठा खांदेपालट करण्यात आला आहे. संघटनात्मक पातळीवर नव्याने पत्ते पिसल्यानंतर आता शिंदे गट निवडणुकीच्या रणांगणात उतरायला सज्ज झाला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे येत्या शनिवारपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात नाशिकमधून होणार असून लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत पक्षबांधणी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांनाही स्थानिक पातळीवर सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde News
Rupali Chakankar ED Inquiry: रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ; SIT चौकशीनंतर आता EDची एन्ट्री

मुंबई आणि ठाणे परिसरात आधीच बैठका आणि दौरे पूर्ण झाले असून आता उर्वरित महाराष्ट्रात शिंदे गट आक्रमकपणे उतरू लागला आहे. महायुतीत स्वतःचा प्रभाव कायम राखण्यासाठी आणि भाजपला थेट आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरेही याच राजकीय समीकरणांचा भाग असल्याचे बोलले जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपवर कुरघोडी करत स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी शिंदे गटाने आता पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com