उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंना लोकसभेआधी शिंदे गट देणार नाशिकमध्ये धक्का?

Shiv sena politics in Nashik loksabha Election 2024 : ठाकरे गटातील काही नेत्यांची शिंदे गटाशी जवळीक वाढल्याने निवडणुकीत होणार फाटाफूट. नाशिकमध्ये शिंदे गट देणार का उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीआधी धक्का ?

Sampat Devgire

Shivsena Uddhav Thackeray Politics : शिवसेना उद्धव ठाकरे गट निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी पदाधिकाऱ्यांची खांदेपालटदेखील केली आहे. मात्र, हे पदाधिकारी गेले वर्षभर शिंदे गटाशी जवळीक साधलेल्या नेत्यांचे मतपरिवर्तन करू शकलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godase आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले आहेत. ते तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेणार आहेत. गोडसे यांनी मतदारसंघातील उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाच्या अनेक नेत्यांना गळाला लावले आहे. नाशिक आणि सिन्नर येथील काही महत्त्वाचे नेते लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप BJP आणि शिंदे Shivsena गटाला साथ देणार हे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सिन्नरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी आमदार राजाभाऊ वाजे Rajabhau waje यांच्यासमवेत असलेले उदय सांगळे हे गेले वर्षभर शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यांनी अध्यक्ष शिंदे गटात प्रवेश केलेला नाही. मात्र, मनाने ते केव्हाच शिवसेना शिंदे गटात सामील झालेले दिसतात. आगामी निवडणुकीत सांगळे स्वतंत्र गट करून शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांचे समर्थक आणि सांगळे सध्या खासदार गोडसे यांच्या प्रचारात थेट सहभागी झालेले दिसतात. त्यामुळे उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाने जिल्हा परिषद अध्यक्ष पद दिलेल्या सांगळे यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर Sudhakar Badgujar यांनी गेल्या आठवड्यात खासदार हेमंत गोडसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर हेमंत गोडसे Hemant Godase गटातदेखील चलबिचल झाली होती. मात्र, सध्याच्या खासदार गोडसे विविध जिल्हा परिषद गटांमध्ये नव्या कामांचे भूमिपूजन उद्घाटन आणि नव्या शाखांच्या फलकांचे अनावरण या कार्यक्रमात व्यस्त आहेत. यानिमित्ताने मतदारसंघात निवडणुकीआधीच दोन दौरे पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. यामध्ये ठाकरे गटाचे काही मोहरे त्यांच्या गळाला लागल्याने गोडसे सध्या आनंदात आहेत. ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचा लाभ शिंदे गटाच्या उमेदवाराला होणार. यामुळे कार्यकर्ते चिंतेत आहेत. इच्छुक उमेदवार विजय करंजकर मात्र याबाबत फारसे काहीही करताना दिसत नसल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनीदेखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची धार्मिक बाज बसविलेला आहे. बाजार समितीचा राजकारणात देविदास पिंगळे गटाला शहर देण्यासाठी ते भाजपची मदत घेण्याच्या विचारात आहेत. आगामी काही दिवसांत त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रवेश होईल. या सर्व घडामोडी उद्धव ठाकरे गटाला शह देणाऱ्या आहेत. त्याचा लाभ महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना होईल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांत एकमेकांना शह देण्यासाठी जोरदार खेळी खेळली जात आहे.

R

SCROLL FOR NEXT