Eknath shinde & devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे नाशिक महापालिकेत भाजपला धक्का देणार?, मुंबईत घेतला आढावा!

Shinde Hints at Blow to BJP in Nashik, Reviews Strategy in Mumbai: नाशिक महापालिका निवडणूक तयारीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आघाडी घेत, दिवसभर मुंबईत आढावा घेतला.

Sampat Devgire

Shivsena Shinde News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने महापालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे. यामध्ये त्यांनी भाजपलाही मागे टाकले आहे. सध्या ३३ प्रभागात पक्षाकडे इच्छूक उमेदवार आहेत. या उमेदवारांना पक्ष नेत्यांनी गुरूवारी निव़डणूक तयारीसााठी खास टिप्स दिल्या.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आज नाशिक महापालिका निवडणुकीसाठी चाचणी केली. त्यासाठी शहरातील चारही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत प्राचारण करण्यात आली होते. यावेळी सर्व नेत्यांकडून फीडबॅक घेण्यात आला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे, सचिव राम रेपाळे, भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, बंटी तिदमे यांसह स्थानिक नेत्यांनी पक्षाच्या मंत्रालया जवळील बाळासाहेब भवनमध्ये सकाळी दहा पासून दिवसभर मुलाखती घेतल्या. यावेळी महापालिकेच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीची तयारी व काय आवश्यकता आहे, हे विशेष करून विचारण्यात आले.

शिवसेना शिंदे पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकतीने उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. उमेदवारी देताना पक्षाची निवडून येण्याची क्षमता विचारात घेतली जाईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पक्ष उमेदवारांना मोठे आर्थिक पाठबळ देईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.

महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना शिंदे पक्षाने स्थानिक पातळीवरून आलेला फीडबॅक विचारात घेतल्या बऱ्याच सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासातील राम रेपाळे यांना नव्याने सचिव म्हणून नाशिकचे जबाबदारी देण्यात आली आहे.

आज झालेल्या मुलाखतीत पक्षाकडे ३३ माजी नगरसेवक इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. इच्छुकांची ही संख्या मोठी आहे. त्यामुळे महायुती एकत्रितपणे लढल्यास भाजप एवढ्या जागा सोडणार का हा गंभीर प्रश्न माजी नगरसेवकांनी विचारला.

त्यावर ज्या माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांना शंभर टक्के उमेदवारी देण्यात येईल, अशा आश्वासन देण्यात आले. त्यामुळे महायुतीच्या जागावाटप फिसकटल्यास शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे आज विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. बहु सदस्यीय प्रभाग असल्याने विविध प्रभागात पुरेसे व प्रबळ उमेदवार नाहीत. तेथे अन्य पक्षातील प्रबळ उमेदवारांना पक्षात घेण्यासाठी 'सर्व काही' करा अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत शिवसेना शिंदे पक्ष भाजपला अडचणीचा ठरतो की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT