MD Drugs Crime: निवडणुका संपल्या, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राचे काय? पुन्हा सुरू झाले एमडी ड्रग्सचे राज्यभर थैमान!

MD Drugs Resurface in Maharashtra After Elections: १३ कोटीचे ड्रग्स सापडले, ललित पाटील जेलमध्ये, राज्यभर ड्रग्जचे रॅकेट चालवते कोण?
Drugs siezed by Shreerampur police
Drugs siezed by Shreerampur policeSarkarnama
Published on
Updated on

Drug Free Maharashtra Campaign: लोकसभा निवडणुकीदरम्यान एमडी ड्रग्स आणि त्याचा राजकीय नेत्यांशी संबंध यावर जोरदार राजकीय आरोग्य प्रत्यारोप झाले होते. यासंदर्भात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यावरही गंभीर आरोप झाला होता. आता हे आरोप थांबले मात्र ड्रग्सचे थैमान राज्यभर सुरूच आहे.

श्रीरामपूर येथे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून १३ कोटींचा ड्रग्स साठा जप्त केला आहे. संदर्भात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर आणि विश्वनाथ कारभारी शिंपणकर या दोघांना अटक केली आहे. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Drugs siezed by Shreerampur police
Devendra Fadnavis : पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकवणं अंगलट येणार, CM फडणवीसांनी दिले कारवाईचे आदेश

अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा पहिल्यांदाच आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात दोन युवकांना अटक करण्यात आली. तिच्याकडे दोन लाख रुपयांचे एमडी ड्रग्स आढळले. आधी धुळे आणि जळगाव येथे अशीच कारवाई करण्यात आली होती.

Drugs siezed by Shreerampur police
Nashik News : गोपीचंद पडळकरांच्या सभेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता; गोडसे, बिश्नोईचे फलक झळकल्यानं खळबळ

ऑक्टोबर २०२३ मध्ये शिंदे (नाशिक) येथील एका कारखान्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली होती. त्यात तीनशे कोटी रुपयांचा एमडी ड्रग्स साठा आढळला. या प्रकरणी ललित पाटील आणि त्याचे दोन सहकारी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्यभर एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा मास्टर माइंड ललित पाटील हा शिक्षेत असतानाही पुण्याच्या ससून रुग्णालयात अनेक दिवस राजेशाही थाटात राहत होता. येथूनच त्याने पोलिसांच्या ताब्यातून पलायन केले होते. यासंदर्भात नाशिकशी संबंधित आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या एका मंत्र्यावर थेट आरोप करण्यात आले होते.

ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगार ललित पाटील याला शिवसेनेत प्रवेश मिळावा यासाठी नाशिकच्या एका मंत्र्याने प्रयत्न केल्याचे बोलले जाते. ससून रुग्णालयात बडदास्त आणि पळून जाण्यातही या मंत्र्याचे नाव घेतले जात होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून महायुती सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत निवडणुकीदरम्यान जोरदार मोहीम उघडली होती. निवडणुका संपल्यावर राजकीय मोहीम थांबली आहे. मात्र राज्यभर एमडी ट्रकचे थैमान सुरूच आहे. या संदर्भात नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक, भिवंडी आदी शहरातून एमडी ड्रग्सचा व्यवसाय होत असल्याने कारवाई करण्यात आले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ड्रग्स मुक्त महाराष्ट्र अशी घोषणा करणारे राजकीय पक्ष निवडणुका संपल्यावर शांत झाले आहेत. पोलीसही याबाबत फारसे गंभीर नसल्याने त्याची चर्चा होत नाही. युवा पिढीला एम डी ड्रगचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. यावर राजकीय नेते तोंड उघडणार का? असा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com