Nashik News, 16 May : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सिडको येथे विराट हिंदू सभा झाली. या सभेत उपस्थित जमाव आणि अन्य कारणामुळे ही सभा वादाचा विषय बनली आहे. याबाबत आता पोलिस कारवाई होणार आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितित सिडको येथे हिंदू जनजागृती सभा झाली होती. या सभेला उपस्थित राहिलेले नेते आणि जमा दोन्हीही चर्चेचा विषय बनले आहेत. या सभेत तरुणांनी नथुराम गोडसे आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवले होते.
या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी स्वतः आमदार पडळकर यांच्याशी संपर्क केला. सभेविषयी माहिती घेतली आहे. तसेच पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करावी अशा सूचना केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे. त्यामुळे सभेत फोटो झळकवणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान याबाबत अंबड पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. सभेत झालेले भाषण आणि झळकावण्यात आलेले फोटो या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयाला गुरुवारी सायंकाळी अहवाल पाठविण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक याबाबत पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.
फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीचे उदातीकरण खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आपण स्वतः पडळकर यांना पोलिसात तक्रार करण्याबाबत सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले. सिडको येथे झालेली ही सभा अनेक कारणाने वादाचा विषय झाली आहे. पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आयोजकही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या सभेला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर, भाजप कामगार आघाडीचे नेते व्यंकटेश मोरे, राहुल आरोटे यांसह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. परस्परविरोधी राजकीय विचारसरणी आणि कामकाज असलेल्या नेत्यांच्या उपस्थितीने देखील चर्चेला एक विषय मिळाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.