Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Politics : शिवसेनेला भाजपपेक्षा राष्ट्रवादीवर भरवसा, स्थानिक निवडणुकीसाठी डोक्यात शिजला वेगळा प्लॅन..

Shiv Sena trust NCP : भाजप सोबत नक्की युती होईल किंवा नाही याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत वेगळा पर्याय सूचवला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics news : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढू अशा घोषणा भाजपकडून केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात भाजपकडून स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी सुरु आहे. त्यादृष्टीने भाजप नेत्यांकडून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या जात आहे. अशी खदखद शिवसेनेच्या गोटातून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाने भाजपच्या भरवश्यावर न राहाता राष्ट्रवादीला जवळ करण्याचा निर्णय विचारात घेतला आहे.

नाशिकमध्ये सोमवारी शिवसेनेची उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती संघटनात्मक आढावा बैठक झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा या बैठकीचा मुख्य विषय होता. भाजप स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी करत असल्याने भाजपच्या भरवशावर राहू नका, भले राष्ट्रवादीसोबत युती करा असा सल्ला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना दिला. यावेळी शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी नेत्यांना ठणकावून सांगितल की, भाजपच्या भरवशावर बिल्कुल राहू नका. एकतर स्वतंत्र लढायची तयारी करु किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युतीबाबत चाचपणी करण्याचा आग्रह धुळे, अहिल्यानगर, जळगाव येथील पदाधिकाऱ्यांनी यावेळी धरला. यावेळी समिती सदस्यांनी वरिष्ठांपर्यंत तुमची भूमिका कळवू असे आश्वासन त्यांना दिलं.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी भाजप संदर्भात वेगवेगळ्या तक्रारींचा पाढा वाचला. भाजप आपल्याला सोबत घेणार नाही याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सचिव संजय मोरे यांनी यावरुन पदाधिकाऱ्यांना काही कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले, नुसता हवेत गोळीबार करुन चालत नाही. सभासद वाढवा, प्रत्येक मतदासंघात लाखाच्या वर सभासद असले पाहीजे. तेव्हा भाजप स्वत:हून युतीसाठी पुढे येईल असा सल्ला दिला.

दरम्यान नाशिकमध्ये झालेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा एकंदरीत सूर पाहाता त्यांना भाजपवर विश्वास नाही हेच दिसतं. त्यामुळे राष्ट्रवादीला जवळ करुन राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा विचार त्यांनी पक्षातील नेत्यांपुढे ठेवला आहे. यातून शिवसेना व भाजपमधील स्थानिक निवडणुकांमधील सत्तासंघर्षांवरुन सुरु असलेली रस्सीखेच उघड झाली आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेना देखील स्वबळावर निवडणुका लढवण्याची वेळ आल्यास त्यासाठी सजग राहण्याची तयारी ठेऊन आहे. प्रसंगी भाजपसोबत न जाता राष्ट्रवादीसोबत जाण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT