Nashik Municipal Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena UBT : काँग्रेस-ठाकरेंची शिवसेना आमनेसामने! दोन जागांचा तिढा, 'स्वीकृत'साठी महायुती डाव टाकणार!

Shiv Sena UBT vs Congress : स्वीकृत नगरसेवकाच्या दोन जागा विरोधकांना मिळण्यासाठी शक्यता आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने विरोधक संधी साधणार असल्याची चर्चा आहे.

Sampat Devgire

Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्तीचा निर्णय येत्या २१ ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, मात्र या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही.

नाशिक महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे १५ आणि काँग्रेस पक्षाचे ३ सदस्य मिळून एक गट नोंदणी करण्यात आला आहे. या संख्याबळाच्या आधारे या आघाडीला स्वीकृत नगरसेवक पदाच्या दोन जागा मिळू शकतात. मात्र, या दोन्ही जागांच्या उमेदवारीवरून दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

काँग्रेसने उघड केली भूमिका

काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी पक्षातर्फे महापालिकेत एक स्वीकृत सदस्य पद मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. पक्षाच्या इच्छुकांचीदेखील तशीच इच्छा असल्याने, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्याबाबत आग्रही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. या संयुक्त बैठकीत खासदार राऊत यांनी काँग्रेसला स्वीकृत पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असे स्पष्ट सुनावल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेसमध्ये नाराजी

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेस गटनेते सुफी जीन चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या एका माजी नगरसेवकाचे नाव स्वीकृत सदस्यत्वासाठी सुचवले होते. मात्र, शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महायुतीची खेळीकडे लक्ष

या वादाच्या पार्श्वभूमीवर, महायुतीकडून काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देऊन त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक कमी करण्याचा महायुतीचा प्रयत्न असला, तरी सध्या या मुद्द्यावरून दोन्ही मित्रपक्षांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT