Maharashtra Fake Baba : अशोक खरातच्या कारनाम्यांचे सहा महिने अन् भोंदूबाबांच्या अटकेची शंभरी, पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी गोष्ट

Over 100 Fake Godmen Arrested Across Maharashtra : अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यापासून आतापर्यंत शंभरहुन अधिक भोंदूवर कारवाई करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे.
bhondubaba case; Ashok Kharat
bhondubaba case; Ashok Kharatsarkarnama
Published on
Updated on

fake godmen Maharashtra : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आज (दि. १७) सप्टेंबर बरोबर सहा महिने पूर्ण झाले आहे. या सहा महिन्यांत पोलिसांनी राज्यात शंभरहून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे. यामध्ये, नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबईत सर्वाधिक भोंदूबाबांवर कारवाई झाल्याचे महा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे म्हणणे आहे.

यातील बहुतांशी प्रकरणांत महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही गंभीर बाब असल्याचे महा. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, कृष्णा चांदगुडे, अॅड. रंजना गवांदे व विष्णुदास लोणारे यांनी म्हटले आहे.

करणी भानामती काढतो, अंगात आलेले भूत उतरवतो, अघोरी पूजा करतो, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, आजारपण यातून बाहेर काढतो, पैशांचा पाऊस पाडतो इत्यादी कारणांसाठी भोंदूबाबांनी भक्तांची फसवणूक केली आहे.

bhondubaba case; Ashok Kharat
Captain Ashok Kharat: खरातचा मुक्काम कारागृहातच; नाशिकच्या न्यायालयात जामिनावर सुनावणी टळली!

भितीपोटी व सामाजिक प्रतिष्ठेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते. खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली, त्यांना न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. त्यातूनच एवढे गुन्हे दाखल झाले आहेत. इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज असल्याचे अंनिसने म्हटले आहे. जादूटोणा विरोधी कायदा व इतर कायद्याच्या कलमाखाली या भोंदूंवर गुन्हे दाखल झालेले आहेत.

गुन्हे दाखल झालेल्या शंभर भोंदूंची यादी

१) अशोक कुमार खरात , नाशिक

२)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर

३) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला

४) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे

५)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी,

सोलापूर

६)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे

७) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई

८) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई

९) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई

१०) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर

११) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई

१२)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक

१३)किसन तळपे मंदोशी, खेड

१४ ) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक

१५) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड

१६) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई

१७) अनिल सोलोमन सिंग

( पादरी), पुणे

१८)शिवराम पराश सावर, पालघर

१९)अल्ताफ हसन मदारी, जळगाव

२०)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर

२१) पिंटू धुमाळ बारामती, पुणे

२२) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा

२३) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक

२४) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर

२५) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे

२६)नवनाथ गवळी, खेड, पुणे

२७) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण

२८) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर

२९) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड

३०) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई

३१)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड

३२) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे

३३) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते,

पश्चिम देवपूर, धुळे

३४) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर

३५) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे

३६) सुधाकर गाडगे, बाळापूर , अकोला

३७) परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड, उत्तमनगर, पुणे

३८) शितल सालके व पोर्णिमा सारस्वत भारती विद्यापीठ, पुणे

३९) योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार

, निजामपूर, साक्री, धुळे

४०) विठ्ठल पवार, महागाव, यवतमाळ

४१) ताहीर रशीद बेग, सक्करदरा, नागपूर

४२) सुधाकर रमेश काळे, अंजनगाव सुर्जी, अमरावती

४३) अशोक रामधन राठोड, वडगाव (जंगल) , यवतमाळ

४४)महेश मोहन बाबर, विटा, सांगली

४५) कमलेश महाराज अधिकारी, इंदिरानगर, नाशिक

४६)परवेज अब्दुल अजीज मेमन , कोंढवा, पुणे

४७) गंगाधर बुरांडे, सावली, चंद्रपूर

४८) भीमराव पुंजाराम बिहाडे, संभाजीनगर

४९) मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज,कन्नड, संभाजीनगर

५०) राजू बन्सी दिवटे, पारनेर, अहिल्यानगर.

५१) मौलाना अब्दुल हलिम शेख.

बारामती, पुणे

५२) मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी, सोलापूर

५३)मारोती चंदरराव मोरे,लातूर , ग्रामीण

५४) भगवान रामभाऊ पगार,सटाणा ,नाशिक

५५)अशोक संपत खरात, शिर्डी , अहिल्यानगर

५६) आय्याज ताज मदारे, नागपूर

५७) राधामोहन मिश्रा, खराडी, पुणे.

५८)रौफ इब्राहिम शेख , मालेगाव, नाशिक

५९) यौवन भानुदास गोहाड, सायखेडा, नाशिक

६०) फिरोज आदम शेख ,कपूरबावडी, ठाणे

६१) संजय शिरोडे , नागपूर

६२) संजय कवडेवार, लोहरा, यवतमाळ.

६३) किशोर धोंडिबा जाधव, लातूर

६४) मुजिम मौलाना, पातूर, अकोला

६५) सुनील मालेपेरमिल वर्गीस, बंड गार्डन,पुणे

६६) पास्टर केनेथ पॉल सिल्वे, कोंढवा, पुणे

६७) अनिल कुबल, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग

६८) स्वप्नील विकास निखाते, वरोरा, चंद्रपूर

६९)तेजस तानाजी कांबळे, करवीर , कोल्हापूर

७० ) तेलंगणा बाबा, पंचवटी, नाशिक.

७१) शशिकांत सीताराम भुजिंगे , मिरज, सांगली

७२)दत्तगिरी गुरु जयराम महाराज ,चांदुर रेल्वे, अमरावती

७३) श्रावण तुकाराम ढोंगे, मूल, चंद्रपूर

७४) डॉ मोहन पुरी, नाशिक

७५) अजय राणा ,अर्नाळा

७६) शाहिस्ता अंजुम मोहम्मद शकील शेख, चंद्रपूर

७७)अमोल दिगंबर गिरी , केज, बीड

७८) रघुदास रामदास चव्हाण, माढा, सोलापूर

७९) गोपाळ लांजेवार, लाखंदूर, भंडारा

८०) धोंडबा अरविंद वाघमारे, विरूर , चंद्रपूर.

८१) सागर जोशी, त्रंबकेश्वर , नाशिक ( गुन्हा ठिकाण- बीड)

८२) स्वप्नील लांडे, वडगाव मावळ, पुणे.

८३) मोहम्मद इस्माईल वारीस शेख, भिवंडी ,मुंबई

८४)कुंडलीक देवराव रूपनर, उदगीर, लातूर

८५)रविंद्र सिताराम भाजीवाले, नागभीड, चंद्रपूर

८६) दिव्या जितेंद्र परमार, कोंढवा, पुणे.

८७)विशाल रामदास खंडागळे , भद्रकाली, नाशिक

८८) देवेंद्र ओम नाथ, राहाता , अहिल्यानगर

८९) रामलाल लक्ष्मण कासदेकर, धारणी , अमरावती

९०)रामनरेश नथ्थू शिवकर्मा , कुही, नागपूर

९१) राईशमिया व अस्मा राईशमिया, नवी मुंबई.

९२)जालिमनाथ कालुनाथ, ओझर मिग, नाशिक.

९३) हिराचंद बर्डे, अभोणा, नाशिक

९४) मोनिका विधाते, बिबवेवाडी, पुणे

९५) देवगण विक्रम सहारे, बल्लारपूर, चंद्रपूर.

९६ ) अरुण रामभाऊ दोरके, यवत, पुणे

९७) सुरेश रमेश येदानी , खापरखेडा, नागपुर

९८) केतन नाना शिंदे, वालचंदनगर, पुणे.

९९) नाव माहीत नाही , चंदननगर , पुणे .

१००) अख्तर खान शामीन खान पठाण, वदोदबाजार, छत्रपती संभाजीनगर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com