Prakash Chitte Shiv Sena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Chitte Shiv Sena : भाजपनं केलेली चूक, मंत्री उदय सामंतांनी टाळली; कट्टर कार्यकर्ताचं घर गाठताच, महायुतीत आग लागली?

Uday Samant Meets Prakash Chitte in Shrirampur Discusses Election : उद्योगमंत्री उदय सामंत श्रीरामपुरात दाखल होत, शिवसेना नेते प्रकाश चित्ते यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली.

Pradeep Pendhare

Uday Samant Shrirampur meeting : भाजपने केलेली चूक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने टाळली आहे. कट्टर कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांची भेट टाळली नाही. भाजप नेत्याने श्रीरामपूरमध्ये येऊन प्रकाश चित्ते यांची सांत्वनपर भेट टाळली होती आणि विरोधकांना घरी गेले.

अर्थातच, यामागे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाॅलिटिक्स होते, असा आरोप प्रकाश चित्ते यांनी केलेला आहे. पण शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी ही चूक टाळली. यासाठी मुंबईत सूत्र हालल्याची चर्चा आता श्रीरामपूरमध्ये रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये (Shrirampur) अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकप्रकारे श्रीरामपूर राजकीय भूकंपाचे केंद्र बनले आहे. आगामी काळात अनेक राजकीय उलथापालथी श्रीरामपूरमध्ये होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांचा दोन दिवसापूर्वी अहिल्यानगर दौरा झाला. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) यांनी त्यांच्या दौऱ्याचं सारथ्य केलं. मंत्री उदय सामंत यांच्या संपूर्ण दौऱ्यात मंत्री विखे पाटील होते. शिर्डी, संगमनेर यानंतर ते श्रीरामपूर इथं मंत्री उदय सामंत आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावर झालं. तासभराच्या कार्यक्रमात एकही भाषण झालं नाही. परंतु शह-काटशहाच्या खेळ्या खेळल्या गेल्या.

अहिल्यानगरच्या राजकारणात श्रीरामपूरमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत असताना, भाजपमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांच्यात राजकीय द्वंद्व पाहायला मिळत आहे. प्रकाश चित्ते यांनी एका मुलाखतीद्वारे गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. प्रकाश चित्ते यांनी भाजपशी 30 ते 35 वर्षांपासून असलेला घरोबा सोडून देत, थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

यानंतर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश चित्ते यांच्या मुलाखतीतील आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता, थेट मंत्री उदय सामंत यांचा दौरा घेत, अहिल्यानगरमधील महायुतीच्या राजकारणावर किती पकड आहे, दे दाखवून दिले. मंत्री उदय सामंत यांना प्रकाश चित्ते यांच्या घराजवळ नेले. श्रीरामपूर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित केले.

चित्तेंच्या घरी जाण्याचा थेट मुंबईतून निरोप?

परंतु, तिथंही प्रकाश चित्ते भारी भरल्याची चर्चा आता श्रीरामपूरमध्ये रंगली आहे. मंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण कार्यक्रम उरकल्यानंतर थेट प्रकाश चित्ते यांचं घर गाठलं. त्यामुळे भाजपने केलेली चूक एकनाथ शिंदे यांच्या शिलेदार नेत्यानं केली नाही, अशी चर्चा रंगली आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्रकाश चित्ते यांच्या घरी जावं, असा थेट आदेश मुंबईतून आल्याची माहिती आहे. हा आदेश खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जाते.

अहिल्यानगरमध्ये महायुतीत सामना?

एकनाथ शिंदे यांच्या या थेट भूमिकेमुळे श्रीरामपूरमध्ये भाजपविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सामना आगामी काळात रंगणार असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा सामना अधिक तीव्र होताना दिसेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यात महायुतीची शक्यता धुसर झाली आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT