Shivsena UBT News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT Politics : पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला; नाशिकमधील शिबिरात कार्यकर्त्यांना देणार निष्ठेचा मंत्र

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Nashik shibir : विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष आत्मपरीक्षणात व्यस्त होता. आता त्यातून बाहेर पडण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये आज मुंबई बाहेर कार्यकर्त्यांचे पहिले शिबिर होत आहे.

Sampat Devgire

Nashik News, 16 Apr : विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा पक्ष आत्मपरीक्षणात व्यस्त होता. आता त्यातून बाहेर पडण्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये आज मुंबई बाहेर कार्यकर्त्यांचे पहिले शिबिर होत आहे.

शिबिराबाबत राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय अभावी त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठी झळ बसली. राज्यात महायुतीने (Mahayuti) सत्तेत आपली मांड घट्ट केली आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभर कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून दौरे करणार होते. या दौऱ्यांना मुहूर्त लागत नव्हता. मात्र आता नाशिकला पहिला मेळावा आज होत आहे. या मेळाव्याचा मुख्य भर शिवसेना पक्षाला लागलेल्या गळतीला रोखण्याचे आव्हान आहे.

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत आहे. या स्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. महायुतीकडून त्यांना रोखण्यासाठी सर्व प्रकारचे राजकीय डावपेच आखले जात आहे. यामध्ये शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे.

या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या नाशिकच्या शिबिरात प्रामुख्याने शिवसेनेतच का राहावे यावर मंथन होणार आहे. त्यात 'मी शिवसेनेतच का?' यावर भर दिला जाणार आहे. शिबिरातील विषय पत्रिकेत तसे संकेत स्पष्ट आहेत. दृष्टीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करावा करावा लागेल.

आज नाशिकमध्ये होणाऱ्या शिबिराचे उद्घाटन युवा नेते आदित्य ठाकरे करतील. त्यानंतर विविध जुन्या नव्या कार्यकर्त्यांना आपली मते, आणि अडचणी मांडण्याची संधी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. हाच पॅटर्न सबंध राज्यभर होणाऱ्या शिबिरांमध्ये वापरला जाणार आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष सध्या महायुतीच्या सत्तेच्या माध्यमातून होणाऱ्या अडवणूक आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक आणि अन्य प्रलोभनांद्वारे पदाधिकाऱ्यांना फोडण्याच्या आव्हानाला सामोरे जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे.

शिवसेना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्यासाठी आपली सत्ता आणि सर्व सामग्रीचा प्रचंड वापर सुरू केला आहे. यावरच एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा आणि भाजपकडे त्यांचे महत्त्व टिकणार आहे. त्या दृष्टीने शिवसेना उद्धव ठाकरे यांना त्यावर मात करण्यासाठी चौकटी बाहेरचे प्रयोग करावे लागतील.

तसे प्रयोग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एआई तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणाऱ्या भाषणाद्वारे केला जात आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात मुंबई महापालिका कशी जिंकावी यावर भर असेल. दृष्टीने शिवसेना ठाकरे पक्षाच्या आजच्या शिबिराला महायुती बरोबरच महाविकास आघाडीच्या अन्य घटक पक्षांच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT