Maharashtra Politics : 'भाजपचे आरएसएससोबत भांडण, बिनाअध्यक्षाचा पक्ष...', PM मोदींच्या 'त्या' टीकेला यशोमती ठाकूरांचे चोख प्रत्युत्तर

Yashomati Thakur Criticized BJP RSS : मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रीय कारभारामुळे आज महाराष्ट्रात गुन्हेगार मोकाट आहेत का ? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSarkarnama
Published on
Updated on

Political Attacks On BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसला येवढ्याच मुस्लिमांचा कळवळा असेल तर त्यांनी आपला राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम व्यक्तीना बनवावे. निवडणुकीत 50 टक्के तिकीटे मुस्लिमांना द्यावीत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

ठाकूर यांनी ट्विट करत 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा याचे फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आपला स्वत:चा पक्ष भाजपला अजून आताच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपून चार महिन्यांचा कालावधी झाला तरी अध्यक्ष निवडता आलेला नाही याकडे लक्ष द्यावे.',असा टोला लगावला.

Yashomati Thakur
Rohit Pawar Vs Gulabrao Patil: मी सोन्याचा चमचा घेऊन, तर तुम्ही पानाला चुना लावत...; रोहित पवार अन् गुलाबरावांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक

'संघासोबत सुरू असलेल्या लढाईत भाजपला गेल्या चार पाच महिन्यापासून अध्यक्ष निवडता आलेला नाही त्याकडे मोदींजीनी जरा लक्ष द्यावे. नाहीतर बिन अध्यक्षांचा पक्ष म्हणून भाजप ओळखला जाईल', असे देखील ठाकूर यांनी म्हटले.

यशोमती ठाकूर यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर देखील भाष्य करताना एका तरुणाच्या हत्येवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. या विषयी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न संवेदनशील आहे. आज पुन्हा माजलगाव तालुक्यात एका तरुणाची भर दिवसा हत्या झाल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब आगे असे या तरुणाचे नाव असून तो किटी ग्रामपंचायतीचा सदस्य आणि भाजपचा कार्यकर्ता आहे.

फडणवीसांचा गृहखात्यावर वचक नाही?

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री भाजपचे असताना राज्यातील भाजपचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित असणार? मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रीय कारभारामुळे आज महाराष्ट्रात गुन्हेगार मोकाट आहेत का ? फडणवीसांचा गृहखात्यावर वचक नाही का ? असा सवाल देखील ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

आरएसएसचा प्रमुख मुस्लिम व्यक्तिला करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर देनाना म्हटले की, भाजपला एवढचा कळवळा असले तर पक्षाच्या अध्यक्षपदी किंवा पंतप्रधान म्हणून मुस्लिम समाजाला संधी द्यावी. सतेच आरएसएसच्या संरसंघचालकपदी महिला किंवा मुस्लिमांना नेमावे.

Yashomati Thakur
Udaysinh Undalkar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे उदयसिंह उंडाळकरांनी सांगितले हे कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com