Ahmednagar News : बदलापूर घटनेचे तीव्र पडसाद कायम आहेत. महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिले आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना देखील मैदानात उतरल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही या घटनेचा वेगवेगळ्या मार्गाने निषेध होत आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाने श्रीरामपूरमध्ये नोंदवलेल्या निषेधाची चर्चा रंगली आहे. प्रशासनाला निषेधाचे निवेदनाबरोबर 'टरबूज' आणि 'बांगड्यांचा आहेर', दिला. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिलेले 'टरबूज' चर्चेत आले असून, हा भाजपमधील बड्या नेत्यावर निशाणा होता, अशी खुमासदार चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने देशातील अनेक कायदे बदलले आहेत. तसाच अत्याचाऱ्याला त्वरीत शिक्षा व्हावी, असा कायदा आणि व्यवस्था निर्माण करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. लहान, शाळेय आणि महाविद्यालयीन मुलींबाबत तरी असा कायदा आणावा की, त्याची धास्ती प्रवृत्ती घेतली पाहिजे. शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर आणि माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून गुन्हेगारांना आणि मिंधे गटातून फुटून गेलेल्या आमदारांना संरक्षण देण्यात व्यस्त आहे. पोलिसांना सामान्य लोकांचे प्रश्न आणि न्याय देण्यासाठी सवडच नाही, प्रत्येक गुन्हा झाल्यावर सरकारकडून दबावतंत्र वापरले जाते. तो गुन्हा कसा दाबल्या जाईल, याचेच प्रयत्न होतात. विशेष म्हणजे, प्रत्येक गुन्ह्यामध्ये शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे लोकच आहेत, असं प्रकर्षाने जाणवते. या दोन पक्षांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारीने थैमान घातल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला.
बदलापुरातील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने प्रशासनाला निवेदन देण्याबरोबर टरबूज दिले. तसेच बांगड्यांचा आहेर दिला. कार्यकर्त्यांनी निषेधासाठी बरेच टरबूज खरेदी करून आणले होते. निवेदन देण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ गुलदगड, अशोक थोरे, अबोली वाकचौरे, प्राजक्ता सदाफळ यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.