Eknath Shinde Politics: आदिवासी महिलांचा मुख्यमंत्र्यांना झटका, "लाडकी बहीण" कार्यक्रमावर बहिष्कार!

Tribal Women Boycott CM Shinde's Women Empowerment Program : पेसा भरतीसाठी राज्य सरकार विरोधात आदिवासी उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे.
Eknath Shinde Trible Womens
Eknath Shinde Trible WomensSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आज मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा कार्यक्रम नाशिकमध्ये होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सबंध शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सत्ताधारी पक्षाने लाडकी बहिण योजनेचा जोरदार प्रचार प्रसार सुरू केला आहे. त्यात सर्व शासकीय यंत्रणा सहभागी झात्या आहेत.

ही तयारी सुरू असतानाच पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांनी मात्र मुख्यमंत्र्यांना चांगलाच झटका दिला आहे. पेठ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीनी या संदर्भात ठराव केले आहेत. जोपर्यंत राज्य शासन राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये १७ संवर्गातील आदिवासी उमेदवारांची भरती करत नाही, तोपर्यंत शासनाला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत ग्रामपंचायतींतर्फे गटविकास अधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांना ठरावाची प्रत देण्यात आली आहे. विविध सरपंचांनी त्यावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील शासकीय यंत्रणेने चांगलाच धसका घेतला आहे.

Eknath Shinde Trible Womens
Balasaheb Thorat Politics: भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने फुंकला विधानसभेचा बिगुल, मतदार साथ देतील का?

राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वकांक्षी कार्यक्रमाला आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व महिला व बालविकास अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना विविध आदेश मिळाले आहेत.

राज्य शासनाचे हे आदेश आम्ही जुमानणार नाही,असे या निवेदनात आदिवासी महिलांनी म्हटले आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेला चांगलाच धक्का बसला आहे. पेठ तालुक्यातील आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडकी भाई नियोजनाच्या कार्यक्रमात हा लक्षात राहील असा झटका दिल्याने, तो चर्चेचा विषय आहे.

पेसा कायद्याअंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये आदिवासी उमेदवारांच्या नियुक्ती अपेक्षित आहेत. मात्र शासनाने त्याला स्थगिती दिली आहे. हा आदिवासी नेत्यांसाठी संवेदनशील विषय बनला आहे.

Eknath Shinde Trible Womens
Nana Patole Politics: नाना पटोलेंचा अचूक नेम, निरूत्तर भाजप आरोपीच्या पिंजऱ्यात!

नाशिकमध्ये त्यावर जोरदार आंदोलन सुरू आहे. काही उमेदवारांनी उपोषण देखील सुरू केले आहे. मात्र पालकमंत्र्यांनी अद्याप त्याकडे लक्ष दिलेले नाही. याकडे या आदिवासी महिलांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.

आंदोलकांनी जिल्हाधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला होता. अद्याप त्यात यश न आल्याने आदिवासी नागरिक आणि नेत्यांच्या भावना तीव्र आहेत. त्याचा झटका आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसाराच्या कार्यक्रमाला बसला आहे. त्यामुळे पोलिस आणि प्रशासन देखील सावध झाले आहे.

याबाबत प्रसिद्ध दिलेले निवेदनावर ५० महिला नेत्या आणि सरपंचाच्या स्वाक्षरी आहेत. श्याम गावित, किरण भुसारे, पंकज पाटील, हेमराज राऊत, ललित शिंगाडे, अमृत चौधरी, उषाबाई गवळी, सुरेखा आवारी, देविदास गायकवाड, आदी विविध पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com