Shivsena leaders with Police
Shivsena leaders with Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केतकी चितळे विरोधात शिवसेनेनेही बाह्या सरसावल्या!

Sampat Devgire

नांदगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठनेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल सोशल मिडियावर अपमानकारक पोस्ट टाकणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketki Chitale) नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना (Shivsena) युवा सेनेच्या शिष्टमंडळाने पोलिस निरिक्षक रामेश्‍वर गाढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Shivsena deemands leagle action against Ketaki Chitale)

कालपर्यंत परिचीत नसलेली, अभिनेत्री म्हणून तीचा वकूब काय हे देखील माहीत नसलेली केतकी चितळे अचानक चर्चेत आली आहे. तीने हे सर्व प्रसिध्दीसाठी तर केले नाही ना?. असा प्रश्न सामान्य नागरिकांत चर्चेत आहे. मात्र तीने केलेली टीका व वक्तव्य अत्यंत हीन दर्जाचे आहे. त्याचे पडसाद आगामी काळातही उमटत राहतील. त्यासाठी नांदगावच्या पोलिसांनी तीला हिसका दाखवावा. तीच्यावर करावाई करून नांदगावला आणावे. त्यामुळे यापुढे असभ्य, व्यत्कीद्वेषातून करण्यात येणाऱ्या टिकेला योग्य चपराक बसेल असे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

केतकीविरोधात गुन्हा नोंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांकडून मार्गदर्शन मागविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्‍वासन पोलिस निरिक्षक गाढे यांनी शिष्टमंडळाला दिले. नाशिक जिल्ह्यात या वादाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विविध पोलिस ठाण्यांत याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या निर्देशानंतर शिवसेना व युवा सेनेच्या शिष्टमंडळाने तक्रारवजा निवेदन नांदगाव पोलिसांना दिले. या वेळी युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, युवा शहरप्रमुख सुनील जाधव, रमेश काकळीज, कमलेश पेहेरे, नितीन सोनवणे, माजी नगरसेवक अनिल जाधव उपस्थित होते.

----------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT