shivsena corporator yuvraj pathare firing sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : शिवसेनेच्या नगरसेवकावर रोखली गावठी पिस्तूल, खटका दाबणार तेवढ्यात...

Yuvraj Pathare Firing In Parner : नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण...

Pradeep Pendhare

Ahmednagar News : गोळीबाराच्या घटनांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच पारनेरचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना पारनेरमधील हॉटेल दिग्विजयमध्ये घडली आहे. ( shivsena corporator yuvraj pathare firing Latest News )

नेमकं काय घडलं?

युवराज पठारे हे शिवसेनेचे नगरसेवक असून, अलीकडच्या काळात विखेंशी त्यांची जवळीक वाढली असल्याचं सांगितलं जात आहे. पारनेरमध्ये हॉटेल दिग्विजय आहे. तिथे काही युवक येऊन बसले होते. युवराज पठारे आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये आल्यावर या युवकांपैकी एकाने उठून युवराज पठारे यांच्या दिशेनं गावठी पिस्तूल रोखलं. हा युवक पिस्तुलाचा खटका दाबणार तेवढ्यात युवराज पठारेंबरोबर असलेले भरत गट यांनी पिस्तूल हिसकावून घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला. पठारेंवर पिस्तूल रोखणाऱ्या युवकाला काहींनी पडकलं. यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी पठारेंवर पिस्तूल रोखणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणलं आहे.

पठारेंवर पिस्तूल रोखणाऱ्या युवकाचं नाव यश जाधव असं आहे. तो पारनेरमधील रांजगाव मशिद येथील असून न्यू इंग्लिश स्कूल येथे १२ वीचे शिक्षण घेत आहे. यश जाधवबरोबर असलेले काहीजण गोंधळाचा फायदा घेऊन निसटले आहेत.

पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर 'सरकारनामा'शी संवाद साधताना म्हणाले, "हा प्रकार नेमका कशातून घडला याची माहिती घेत आहे. युवकाबरोबर अन्य कोणी साथीदार होते का? याचा शोध घेतला जातोय."

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT