Nashik News : 'राज्यात असलेल्या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा हाच मोठा प्रश्न आहे. अनेकांना अनेक आश्वासन देण्यात आली. मात्र, त्या आश्वासनाची पुर्तता झालेली नाही. मराठा आरक्षणाबाबत सुद्धा हीच स्थिती आहे. सरकारने संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक तर केली नाही ना, अशी शंका उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. त्यांना हे सरकार कसा प्रतिसाद देते आणि आश्वासन देते याकडे आमचे लक्ष असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट करीत सरकारवर टीकास्त्र सोडले. (Latest Marathi News)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला. मागील महिन्यातच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी आपला मोर्चा नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राकडे वळवला आहे. या दौऱ्याची सुरूवात आज इगतपुरी येथून झाली. मात्र वेळेअभावी इगतपुरी येथील संवाद मेळावा गुंडाळावा लागला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
इगतपुरी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. सरकारवर विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. सरकारने अनेक घटकांना अनेक आश्वासन दिली. मात्र, त्या आश्वसनांची पुर्तता झाली नाही. मराठा आरक्षणाबाबत सुद्धा हीच स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मराठा समाजाची फसवणूक तर केली नाही ना, अशी शंका येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. समाजाच्या मागण्यांसाठी मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. आता सरकार काय आश्वासन देते आणि काय प्रतिसाद देते याकडे आमचे लक्ष असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. इगतपुरी येथील जाहिर सभा टाळून आदित्य ठाकरे थेट सिन्नरकडे रवाना झाले.
आमदार आदित्य ठाकरे 14 आणि 15 फेब्रुवारीला नाशिक आणि जळगावचा दौरा करणार आहेत. आज इगतपुरी येथील संवाद मेळावा रद्द झाल्यानंतर आदित्य ठाकरे थेट सिन्नरला रवाना झालेत. यानंतर ते नाशिकमध्ये पदाधिकारी, शिवसैनिक आणि मतदारांबरोबर संवाद साधणार आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.