Shiv Sena News : माजी मंत्री घोलपांनी वेळ साधली; अखेर ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
Babanrao Gholap
Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर असतानाच त्यांना मोठा धक्का बसला. माजी मंत्री आणि उपनेते बबन घोलप यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. (Shiv Sena News)

शिर्डी लोकसभा (Lok Sabha) मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच अन्य काही कारणे देत घोलप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आपल्या राजीनामा पाठविला आहे. या राजीनामाचे पत्र त्यांनी सोशल मीडियावर देखील व्हायरल केले आहे. घोलप यांचा हा राजीनामा अपेक्षितच असून गेल्या काही दिवसांपासून शिर्डी मतदार संघाच्या पक्षांतर्गत राजकारणावरून पक्षाचे वरिष्ठ नेते आणि घोलप (Baban Gholap) यांच्या दुरावा निर्माण झाला होता.

Babanrao Gholap
Aditya Thackeray On CM : मराठा आरक्षणप्रश्नी आदित्य यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर 'ठाकरी प्रहार'; म्हणाले...

आपण गेली 25 वर्ष प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले आहे. उपनेते तसेच पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या मनापासून काम करून यशस्वी केल्या आहेत. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. जुन्या पदाधिकाऱ्यांबाबत मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ प्रमुखांकडून तक्रारी होत्या. असे असतानाही पुन्हा त्याच पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले, अशी नाराजी घोलप यांनी व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोलप म्हणतात, एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारी याला देखील कोणतीही नियुक्ती न देता संघटनेपासून लांब ठेवले आहे. विकाऊ आणि बिनकामाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त केल्याने त्याबाबत वरिष्ठांकडे कळूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वेतन आपण राजीनामा देत आहोत.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी शिर्डी मतदार संघात दौरा केला. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात संवाद मिळावे घेतले होते. दोन्ही कार्यक्रमांना बबनराव घोलप आणि उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात माजी महापौर नयना घोलप, माजी आमदार योगेश घोलप देखील अनुपस्थित होते. त्यामुळे घोलप यांच्या पक्षाकडून काही निर्णय होण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

घोलप यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली होती. या बैठकीत चर्मकार संघाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र पडद्यामागे शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट या राजकारणातील डाव मांडण्यात आले होते. शिंदे गटाकडून नाशिकमध्ये माजी मंत्री घोलप आणि त्यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप गळायला लागल्याने ठाकरे गटाला सावरण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटाकडून घोलप अथवा त्यांचे पुत्र यापैकी एकाची चर्मकार उद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

(Edited By - Rajanand More)

Babanrao Gholap
Aaditya Thackeray News : पुन्हा मिठाचा खडा,'वंचित'ची ठाकरेंच्या बैठकीकडे पाठ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com