babanrao gholap - raj thackreray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Babanrao Gholap News : माजी मंत्री घोलपांचा मनसे अध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी मात्र...; नेमकं काय घडलं?

ShivSena Eknath Shinde Group Former Minister : राज ठाकरे हे दिसताच मोठ्या उत्साहाने बबनराव घोलप हे त्यांना भेटण्याासाठी गेले. ठाकरे यांच्या गाडीजवळ घोलप यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली

Chaitanya Machale

Nashik News : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे हे गुरुवारी नाशिक येथे आले आहेत. त्यावेळी घोलप यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरेंनी घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्तान ठेवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर ठाकरे दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात जात असताना माजी मंत्री बननराव घोलप यांनी ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाकरे यांनी घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केले.

घोलप हे शिवसेनेचे नेते आहे. त्यांनी शिवसेनेच्या (ShivSena) सरकारमध्ये मंत्री म्हणून देखील काम केलेले आहे. शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये त्यांनी समाजकल्याण मंत्री म्हणून जबाबदारी संभाळली होती. देवळाली मतदारसंघात सलग 25 वर्षे ते आमदार म्हणून निवडून आले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांनी उपनेते म्हणून देखील काम केले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे गटामध्ये आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांनी शिंदे गटात प्रवेश करताना व्यक्त केली होती.

राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकेकाळी शिवसेनेत असताना बबनराव घोलप यांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे. राज ठाकरे हे दिसताच मोठ्या उत्साहाने घोलप हे त्यांना भेटण्याासाठी गेले. राज ठाकरे यांच्या गाडीजवळ घोलप यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. दरम्यान, घोलप यांना भेट देणे राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक टाळले की त्यांच्याकडून नकळतपणे ही भेट टाळली गेली, याची उलटसुलट चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी मंत्री घोलप यांची भेट घेणे राज ठाकरे यांनी टाळल्याने घोलप यांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी देखील व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT