Nashik Politics: नाशिक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नामसाधर्म्य असलेल्या अन्य किशोर दराडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यालयात प्रचंड गदारोळ आणि धक्काबुक्की झाली.
शिक्षक मतदारसंघात राजकारण शिगेला पोहोचलं आहे. प्रचंड स्पर्धा, अनेक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून खेळले जाणारे डावपेच या सर्वांचा वापर येथे केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून प्रमुख उमेदवारांच्या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराने ही अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप आणि धक्काबुक्कीचे प्रकारही घडले.
शुक्रवारी (ता. 7 जून) रोजी दुपारी विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केला. दोघांचे नाव सारखेच असल्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे आमदार दराडे संतप्त झाले. त्यांनी अपक्ष किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की करीत अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवीगाळही झाली. या सर्व गोंधळात पक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न आमदार दराडे यांनी केला, अशी तक्रार आहे. या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या समर्थकांकडून विभागीय माहिती कार्यालयात गदा रोड झाला. त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांची ही धावपळ झाली.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे उमेदवार आमदार दराडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी हे कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे. या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नामसाधर्म्य असलेला बाबू भगरे हा उमेदवार देण्यात आला होता. त्यांनाही तुतारी हेच चिन्ह देण्यात आले होते. कोणालाही माहिती नसलेल्या आणि अल्पशिक्षित असलेल्या या उमेदवाराला एक लाख मते मिळाली आहेत. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा पराभव होता होता राहिला.
हा प्रयोग ताजा असल्याने आमदार दराडे यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे. या दोन्ही उमेदवारांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. यावेळी आमदार दराडे यांनी अन्य किशोर प्रभाकर दराडे यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.