Sharad Pawar & Anil Kadam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Niphad Political News: दिलीप बनकरांचा करेक्ट कार्यक्रम होणार?, अनिल कदम आणि शरद पवार दिल्लीत भेट!

Sampat Devgire

NCP- Shivsena politics of Niphad : नाशिक जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गुरुवारी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी नवी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत मिळालेल्या संकेतांमुळे अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांची झोप उडू शकते. कदाचित बनकर यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्हे आहेत. (Niphad Constituency politics may take new turn for 2024)

शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार अनिल कदम यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pwar) यांची भेट घेतली. ही भेट कांदा, टोमॅटोच्या प्रश्नावर होती. मात्र, त्यातील काही संकेत निफाडच्या (Niphad) राजकारणाला नवे वळण देण्याची शक्यता आहे.

गुरुवारी नवी दिल्ली येथे माजी आमदार कदम यांनी शरद पवार यांची पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी कांदा, टोमॅटो उत्पादकांच्या समस्यांबाबत कदम यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा पवार यांच्याकडे मांडल्या. निफाड तालुक्यात कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे होणारे नुकसान तसेच त्यावरील तोडगा याविषयी पवार यांनी त्यांना काही सूचना केल्या.

मात्र या भेटीत पवार यांनी अनिल कदम यांच्याकडे तालुक्यातील राजकीय स्थितीबाबत आवर्जून माहिती घेतली. त्यात त्यांचा हेतू आगामी निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणी करण्याचा असावा. या वेळी पवार यांनी कदम यांनी दिलेल्या संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि एकेकाळी विश्वासू सहकारी मात्र अजित पवार गटासोबत गेलेल्या बनकर यांच्या राजकीय भवितव्याबाबत धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या भेटीने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यतादेखील आहे.

दरम्यान, माजी आमदार कदम यांनी ही भेट बिगरराजकीय हेतूने घेतली होती. त्यात शरद पवार यांनी अतिशय आस्थेने आपली कौटुंबिक आणि अन्य माहिती घेतली. मी शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. निवडणूक माझ्यादृष्टीने गौण आहे. प्रसंगी ठाकरे यांनी सांगितल्यास माझी निवडणुकीत थांबण्याचीदेखील तयारी आहे. मात्र, पवार साहेब महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे, असे `सरकारनामा`ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT