Nashik NCP News : विमा कंपन्या मुख्यमंत्र्यांचेही ऐकेनात, शेतकरी प्रतीक्षेतच!

Crop Insurance companies disrupted CM relief order for farmers-नाशिकच्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून २५ टक्के भरपाई मिळत नसल्याने शेतकरी वैतागले...
Gokul Pingle
Gokul PingleSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP News : नाशिक जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना २५ टक्के भरपाईचे आदेश दिले. मात्र, सर्वच विमा कंपन्यांनी ते आदेश धुडकावले आहेत. अद्याप एकाही शेतकऱ्याला भरपाई मिळाली नसल्याने पालकमंत्री करतात तरी काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते गोकुळ पिंगळे यांनी केला आहे. (NCP leader Gokul Pingle criticized state Government on drought issue)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात दुष्काळाने शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे. सर्वच पिके वाया गेली आहेत. त्यात पावसाचा खंड पडल्याने नियमानुसार विमा कंपन्यांनी (Crop insurance) शेतकऱ्यांनी भरपाई देणे आवश्यक आहे.

Gokul Pingle
NDCC News : राष्ट्रवादीच्या थकबाकीदार नेत्यांना पोलिस देताहेत संरक्षण!

पावसाने सलग २१ दिवस ओढ दिल्यास शेतकऱ्यांना पीकविम्याची २५ टक्के रक्कम भरपाई म्हणून देण्याची तरतूद आहे. राज्य शासनाने आवाहन केल्याप्रमाणे सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा केला आहे, राज्य शासनाने विमा कंपन्यांना विम्याची रक्कम वर्ग केल्याची घोषणा केली आहे.

याबाबत सातत्याने शेतकरी तक्रार करीत असल्याने तसेच जवळपास महिनाभराचा पावसाचा खंड पडलेला आहे. नाशिकच्या लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षांकडून पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यांपूर्वी २५ टक्के भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत. मात्र, १५ दिवस उलटूनही एकाही विमा कंपनीने एकाही शेतकऱ्याला भरपाई दिलेली नाही. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचेच आदेश धुडकावले आहेत. यावर शासन गप्प का?. शेतकऱ्यांचे हाल होत असताना पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन काय करीत आहे?, असा प्रश्न पिंगळे यांनी केला.

याबाबत तातडीने जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार) आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पिंगळे यांनी दिला आहे.

Gokul Pingle
Sharad Pawar to Patel : भेटीचा फोटो ट्विट करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना पवारांनी विचारला जाब

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com