Dada Bhuse & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon News; संजय राऊत मालेगावला, दादा भुसे काही दिसेना!

पालकमंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांना आव्हान दिल्याने राऊत दोन दिवस आधीच शहरात दाखल झाले.

Sampat Devgire

मालेगाव : (Malegaon) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मालेगावला येऊन दाखवावे असे आव्हान दिले होते. त्याप्रामणे शिवसेना (Shivsena) नेते राऊत दोन दिवस आधीच येथे दाखल झाले. परंतु आव्हान देणारे भुसे मात्र मुंबईच (Mumbai) थांबले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांतील आव्हान, प्रती आव्हानांची चांगलीच चर्चा आहे. (Sanjay Raut came at Malegaon but Dada Bhuse stuck in Mumbai)

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा आज मालेगाव येथे होत आहे. त्यानिमित्ताने गेले काही दिवस शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांनी राऊत यांना मालेगावात येऊन दाखवावे असे आव्हान दिले होते. त्याचीच चर्चा सुरु आहे.

भुसे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील का याची उत्सुकता होती. खासदार राऊत यांनी भुसे यांचे आव्हान स्विकारले. ते दोन दिवस आधीच मालेगाव शहरात दाखल झाले आहेत. मात्र यावेळी श्री. भुसे मात्र मुंबईतच थांबले आहेत. त्यामुळे हे राजकारण काय वळण घेते याची उत्सुकता आहे.

यासंदर्भात श्री. राऊत म्हणाले, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. या राज्याच्या मातीमध्ये गद्दारीला आणि बेईमानीला थारा नाही. मागील काही महिन्यात या मातीत तात्पुरते भांगेच पीक आले. जनता भांगेचे हे पीक उपटून फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. पालकमंत्र्यांनी मला मालेगावात येऊन दाखवा असे आवाहन दिले होते. मी दोन दिवस आधीच मालेगावात आलो आहे. कदाचित जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. त्यामुळेच आपल्याला हिरे सापडले असे मत शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी येथे व्यक्त केले.

श्री. राऊत म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींना शिवसेनेने सर्व काही दिले. त्यांना हळूच कोणीतरी खोक्याचे आमिष दाखवले अन् ते पळून केले. सध्या चोरांचा सुळसुळाट आहे. मालेगावतही चोर आहेत. येथील लोकप्रतिनिधीने गिसाका वाचविण्यासाठी कोटी रुपये जमा केले. फक्त १६ कोटी ५० लाख रुपये दाखवले. त्यामुळे चोराला चोर नाही तर काय म्हणायचे. ही त्यांची शेवटची निवडणूक आहे.

राज्याला संदेश देतानाच गद्दारांचा समाचार घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावला येत आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे व त्यांच्या कुटुंबात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता होती. तीच क्षमता व प्रचंड ऊर्जा शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्यात आहे. त्यांनी राज्याकडे सुद्धा लक्ष द्यावे.

येथील प्रशांतदादा हिरे व्यापारी संकुलातील (रॉयल हब) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, उपनेते अद्वय हिरे, संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर, पवन ठाकरे, नथू जगताप, अशोक निकम, संजय निकम, विष्णू पवार, रामा मिस्तरी, प्रकाश वाघ, डॉ. उज्जैन इंगळे, सुभाष सूर्यवंशी, हिरालाल नरवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT