Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती आज राजकीय स्फोट करणार?

Sambhajiraje Chhatrapati : नवी मुंबईतील कोपर खैरणेमध्ये आज संभाजीराजे छत्रपतींची सभा होणार आहे.
Sambhajiraje Chhatrapati :
Sambhajiraje Chhatrapati :Sarkarnama
Published on
Updated on

Sambhajiraje Chhatrapati Latest news: स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंर आज (२६ मार्च) नवी मुंबईतील कोपर खैरणेमध्ये सभा होणार असून या सभेत स्वराज्य संघटना राजकीय रणशिंग फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. इतकेच नव्हे तर, संभाजीराजे छत्रपती काही मोठे राजकीय स्फोट करणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती इतर राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या पण आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या तरुणांना स्वराज्य संघटना संधी देणार आहे.आजच्या या सभेमध्ये स्वराज्य संघटनेची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या सभेत संभाजीराजे छत्रपती नेमकं काय बोलणार याकडे हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Sambhajiraje Chhatrapati :
Maharashtra Politics : शरद पवार कलाकार,त्यांची..; शिंदे गटातील नेत्याच्या विधानामुळे चर्चांना उधाण

स्वराज्य संघटनेच्या माध्यमाचून आगामी काळात इतर पक्षात काम करणाऱ्या पण आतापर्यंत फारशी संधी न मिळालेल्या तरुणांना संधी देणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी काळात स्वराज्य संघटनेत मोठ्या प्रमाणात तरुणांचा प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशीच संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेच्या विजयाची गुढी उभारली होती.ज्याप्रमाणे त्यांनी थेट धाराशीवमध्ये जाऊन मंत्री तानाजी सावंतांची पोलखोल केली. तशीच इतर राजकीय मंत्र्यांचीही संभाजीराजे पोलखोल करणार असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे आजही छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com