Maharashtra Politics : शरद पवार कलाकार,त्यांची..; शिंदे गटातील नेत्याच्या विधानामुळे चर्चांना उधाण

Sharad Pawar : आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात...
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखठोक विधानं आणि अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील हटके भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा पाटील यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील चिंचपुरे गावात मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पाटील म्हणाले, शरद पवार आहेत ना, कलाकार आहेत…आणि पवार म्हणजे चावी आहेत. ती चावी कुठं बी चालते. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा पटोबाचा एक माणूस पटवला. अशी मिसळ तयार झाली अन् 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले असं विधान गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी करतानाच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Sharad Pawar
PM Modi news: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा ढिसाळपणा; सुरक्षा कडं भेदून तरुण थेट ताफ्यात घुसला अन्...

यावेळी पाटील यांनी राजकीय नेत्यांवरही भाष्य केलं. पाटील म्हणाले,आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही. त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जे पोलीस आधी पकडायचे ते आता संरक्षण करायला माझ्या मागे असतात असं गुलाबराव म्हणाले. 1990/92 मध्ये गणपती उत्सवात तेव्हा पोलीस मला पकडण्यासाठी माझ्या मागे असायचे. गणपती, दुर्गा पूजा, शिवजयंती असे सण आले की, पोलीस मला पकडण्यासाठी मागे असायचे. पण आता बरं वाटतं, पोलिसांची एक गाडी मागे एक गाडी पुढे, काय रुबाब आहे ना? माणसाचे दिवस कसे बदलतात असंही पाटील यावेळी म्हणाले.

Sharad Pawar
Eknath Shinde News: ''बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी अमित शाहांना...''; मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

पवारांची जी बुद्धी चालते, तशी...

यापूर्वीही एका लग्नसमारंभात पाटील यांनी पवारांवर भाष्य केलं होतं. पाटील म्हणाले, "लग्नातील मुलगी पवार कुटुंबातून येते, त्यामुळे आम्ही घाबरून असतो पवारांना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सकाळी सकाळी शपथ घेऊन टाकता आणि काय करून टाकता, आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना आम्ही घाबरून असतो. त्यामुळे पवारांना कायम बरोबर घ्यावं लागतं. कारण पवारांची जी बुद्धी चालते, तशी बुद्धी कोणाचीच चालत नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com