Deepak Kesarkar, Shubhangi Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena Politics : दीपक केसरकर यांनी शब्द फिरवला! उपनेत्या शुभांगी पाटील मैदानात...

Sampat Devgire

Shubhangi Patil News : विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांनी वेतन वाढीसाठी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. राज्यातील आठ ते दहा हजार शिक्षक मुंबईत आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसले होते. या शिक्षकांना ऑक्टोबर महिन्यात आंदोलन मागे घ्यावे, यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लिखित आश्वासन दिले होते. या आश्वासनावरून आता राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

शिक्षणमंत्री केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सात नोव्हेंबरला या शिक्षकांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. शंभर टक्के अनुदान देणे शक्य नसल्याचे सांगून अनुदानाचा पुढील टप्पा तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिले. त्याच्या आश्वासनामुळे शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले मात्र शिक्षकांच्या वेतनाबाबत दिलेले आश्वासन राज्य शासनाने पाळले नाही. त्यामुळे या शिक्षकांमध्ये मोठी नाराजी आहे.

शिक्षकांच्या या आंदोलनाला संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षा आणि शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी सक्रिय पाठिंबा देऊन आंदोलनात भाग घेतला होता. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या आंदोलनाची दखल घेऊन पाठिंबा जाहीर केला होता. शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून या मागणीकडे लक्ष वेधले होते. आता या प्रश्नावर शिवसेनेसह शिवसेनेच्या विविध संघटना एकत्र आल्या आहेत. या संघटनांनी असून दीपक केसरकर यांना घेण्याची पूर्ण तयारी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या पाटील म्हणाल्या, शिक्षणमंत्र्यांनी आपला शब्द फिरवला. शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यांनी लिखित स्वरूपात दिलेले आश्वासन तरी पाळायला हवे होते. तसे न झाल्याने राज्यातील सर्व शिक्षक संतप्त झाले आहेत. राज्यातील सर्व 23 संघटना एकत्रित आले आहेत.

शिक्षकांनी 3 जानेवारीपासून पुन्हा एकदा आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. सर्व त्यात सक्रिय भाग घेतला असून शिक्षणमंत्री केसरकर यांनी आपल्या आश्वासनाची कार्यवाही करीपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या इशारामुळे शिवसेनेने दीपक केसरकर यांना शिक्षकांच्या प्रश्नावर घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने हा मुद्दा आता राजकीय बनला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या आंदोलनाचे पडसाद उमटण्याची चिन्हे असल्याचा संकेत पाटील यांनी दिले.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT