NCP Vs Congress : जागा 'राष्ट्रवादी'ची तयारी 'काँग्रेस'ची, सलग दोन पराभवामुळे...

Political News : नाशिकसाठी अमित देशमुख यांची तर, दिंडोरीसाठी अनिल पटेल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
Rahul gandhi, sharad pawar
Rahul gandhi, sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : महाविकास आघाडीत अजून जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून एकमेकांच्या जागांवर दावा सांगण्यात येतो आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील वेगळे चित्र नाही. नाशिक आणि दिंडीरी मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा मजबूत करत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा सलग दोनदा पराभव झाल्याने ही जागा आपल्याच मिळेल, अशी शाश्वत काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत.

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रदेश कार्यकारणीला खडखडून जागे केले आहे. नाशिकसाठी अमित देशमुख यांची तर, दिंडोरीसाठी अनिल पटेल यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोन्ही जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही जागांवर लोकसभा निवडणुकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सलग दोन वेळा पराभव झाल्याने या जागा काँग्रेसला मिळण्याची अपेक्षा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते आहे.

Rahul gandhi, sharad pawar
Lok Sabha Election 2024 : 'मिशन 45'साठी महायुतीचे महत्त्वाचे पाऊल, एकाच वेळी 36 ठिकाणी...

राष्ट्रवादी (शरद पवार गट) नाशिकसाठी गोकूळ पिंगळे यांनी दंड थोपटले आहेत. तर, दिंडोरी लोकसभा मतदार संघावर शरद पवारांचे विशेष प्रेम आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर लागलीच शरद पवार यांनी दिंडोरी गाठून रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले होते. कार्यकर्त्यांची मोठी फळी आजही शरद पवारांसोबत आहे. परिणामी, किमान दिंडोरी मतदार संघातून शरद पवार माघारी घेण्याची शक्यता कमीच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशी असेल जागांचे वाटप?

नाशिकमधील तीन आणि धुळे जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदार संघ मिळून तयार झालेल्या धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा सलग तीनपेक्षा अधिक वेळा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा झालेला पराभवाचा मुद्दा बाजुला सारला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. तसेच नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेच्या शिंदे गटात असले तरी शिवसेना (उबाठा) नाशिक लोकसभा मतदार संघावरील हक्क सहजतेने सोडणार नाही. एकंदरीत दिडोंरीसाठी शरद पवार गट, नाशिकसाठी ठाकरे गट तर, धुळ्यासाठी काँग्रेस असे जागावाटप होण्याची शक्यता आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com