Mumbai News : माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण मुंबईतून पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचा दावा केला जात आहे. पण त्यांनी साधलेल्या टायमिंगवरून काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आजपासूनच सुरू होत आहे. राहुल यांच्या यात्रेला अपशकून व्हावा, यात्रपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठीच देवरा यांनी आजचा दिवस निवडल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) केली आहे.
पटोले यांनी म्हटले आहे की, आजपासून सुरु होणा-या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत.
काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबत असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवटही होणार आहे, असे म्हणत पटोलेंनी भाजपवर टीका केली.
तर थोरातांनी हा अपशकून असल्याचे म्हटले आहे. आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 6 हजार 700 किलोमीटरची यात्रा काढणा-या राहुल गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल, असे थोरात म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.