Dada Bhuse & Sushama Andhare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Drug Mafia Lalit Patil : धनुष्यबाण शिंदे यांनी पळवला...अचूक बाण मात्र अंधारे यांनीच मारला!

Sampat Devgire

Sushama Andhare On Dada Bhuse : शिवसेनेत फूट पडल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणदेखील मिळवला. मात्र, शिंदे गटावर अचूक राजकीय बाणांचा मारा फक्त सुषमा अंधारे यांनीच केला. सध्याच्या ड्रग्जप्रकरणी अंधारे यांनी केलेल्या आरोपांच्या बाणाने तर मंत्री दादा भुसे यांना अक्षरशः घायाळ केले. (Dada Bhuse followers in Malegaon badly hurt in Malegaon)

नाशिकमधील (Nashik) ड्रगमाफीया ललित पाटील याचे शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांशी असलेल्या संबंधांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, यामध्ये सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांच्या बाणाने पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा अचूक वेध घेतला आहे.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकचा ड्रगमाफीया ललित पाटील याला पुण्यात ससून रुग्णालयात कोणाच्या शिफारशीवरून दाखल करण्यात याले याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.

त्याला पालकमंत्री भुसे यांनीदेखील उत्तर देत, शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) संशयित ललित पाटील याने प्रवेश केला होता. या वेळी माजी महापौर विनायक पांडे यांच्या पुढाकाराने त्याच्याशी संपर्क आला; तसेच प्रवेश करताना मी उपस्थित होतो, असा खुलासा केला आहे. मात्र, त्यांनी याबाबत शिवसेनेच्या नेत्यांवर हा डाव उलटवण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील राज्य सरकारवर आरोप केला. पुण्यातील आमदार धंगेकर यांनीदेखील या आरोपांचा पुनरुच्चार केला. यामध्ये अचूक बाण ठरला तो सुषमा अंधारे यांचा. त्यांनी यामध्ये चौकशीची मागणी करीत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाच थेट प्रश्न केला.

अंधारे यांचा हा राजकीय बाण अचूक लागला. त्यातून आणखी काही दिवस तरी हे प्रकरण धगधगत राहण्याची चिन्हे आहेत. मालेगाव शहरात दादा भुसे समर्थकांनी याबाबत निदर्शने करीत अंधारे यांच्या प्रतिमेला जाडो मारले. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खोटे बेताल आरोप करणाऱ्या अंधारे यांच्या वक्तव्याची राज्य शासनाने दखल घेऊन कारवाई करावी. त्यांनी माफी न मागितल्यास गुन्हा दाखल करू, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, शहरप्रमुख छाया शेवाळे, अरुणा चौधरी, मनीषा अहिरे, चंदा महाले, हेमलता मानकर, साधना सोनवणे, प्रीती पठाडे, अश्विनी विचारे, आयेशा शेख, अरुणा पठाडे, शारदा लिंगायत, मनीषा सोनवणे, जिल्हाप्रमुख संजय दुसाणे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT