Gulabrao Patil & Aditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil politics: गुलाबरावांचा दावा, शिवसेना ठाकरे पक्षाचे दहा आमदार शिंदेंच्या संपर्कात?

Shivsena UBT; Eknath Shinde's Minister gulabrao Patil replyed to Aditya Thackrey-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना दिला राजकीय सल्ला.

Sampat Devgire

आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री पदाचा नियुक्तीस होणारा विलंब याबाबत राज्य शासनावर टीका केली होती. विशेषतः एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला होता. त्याला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले.

Gulabrao Patil News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे पक्षाचे राजकीय मनोबल वाढले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हिणवण्याची एकही संधी या पक्षाचे नेते सोडत नाहीत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला असेच आव्हान दिले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी नुकतेच शिवसेना पक्षातील राजकीय स्थितीबद्दल विधान केले होते. त्यामुळे शिवसेना विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. विशेषतः शिवसेना शिंदे पक्षाने त्याचा आधार घेत उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

या संदर्भात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना तातडीने उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आधी आपल्या पक्षातील भास्कर जाधव यांसारख्या नेत्यांना आवरावे. या पक्षाचे वीस आमदार आहेत त्यांचे काय? याचा विचार करावा असा टोमणा त्यांनी मारला.

पाटील म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वीस आमदार आहेत. या आमदारांमध्ये वाद आहेत ते एकमेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात यातील दहा आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा खळबळ जनक दावा त्यांनी केला.

राज्य शासनाने शनिवारी राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त केले. त्यामुळे आता शासनाच्या कामाला अधिक गती येण्याची चिन्हे आहेत. या पालकमंत्र्यांकडून आता जिल्ह्याच्या कारभारावर नियंत्रण प्रस्थापित होईल. यामध्ये महायुतीच्या पक्षांमध्येही परस्परांत स्पर्धा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील स्पर्धा आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महापालिकेचे निवडणूक आणि राज्यातील महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात अधिक प्रबळ झालेल्या महायुतीकडून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना अडचणीत आणण्याचा कोणतीही संधी सोडली जाणार नाही हे स्पष्ट आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT