Rajabhau Waje in Lok Sabha : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत इंग्रजीमध्ये भाषण केलं आहे. त्यांनी हे भाषण करण्याला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या टीकेची पार्श्वभूमी आहे.
कारण, "खेड्यांतील माणूस इंग्रजी जमणार नाही" अशी टीका राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्यावर निवडणुकीदरम्यान करण्यात आली होती. त्यांच्यावरील या टीकेला आता त्यांनी थेट कृतीतून उत्तर दिलं आहे.
यासाठी राजाभाऊ वाजेंनी (Rajabhau Waje) लोकसभेत फाड फाड इंग्रजीमध्ये भाषण करत विरोधकांना उत्तर दिलं आहे. लोकसभेत त्यांनी आरोग्यविषयक महत्वाचे प्रश्न मांडले, ते मांडताना त्यांनी इंग्रजीत बोलणं पसंत केलं.
लोकसभेत बोलताना राजाभाऊ वाजे म्हणाले, अर्थसंकल्पात हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. माझ्या मतदारसंघात कुंभमेळा आयोजित केला जातो. नाशिकमधील (Nashik) मेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे. यावेळी मोठ्या संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होतात. याचा समावेश युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये केला आहे. मात्र, नाशिकमधील रुग्णालयं अद्ययावत नाहीत.
शिवाय तिथे सुविधाही उपलब्ध नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता, सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून योग्य पावलं उचलण्याची गरज असून ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी यावेळी लोकसभेत केली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे सेनेमध्ये लढत झाली होती. या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांचा 1 लाखाहून अधिक मताधिक्यांनी विजय झाला. तर शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची खासदारकीची घौडदौड वाजेंमुळे रोखली होती. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांन वाजे हे खेड्यांतील माणूस असून त्यांना इंग्रजी जमणार नाही, अशी टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.