Shivsena Party And Symbol : तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत आता 'या' दिवशी सुनावणी

Supreme Court : शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी एकाच दिवशी 7 ॲागस्ट रोजी सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री शिंदे यांना बहाल केले.

त्याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी झालेली नाही. ती आता 14 ऑगस्ट रोजी सुनवणी होणार आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने ठाकरे गटास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray हा पक्ष तर मशाल हे चिन्ह दिले होते. तोच पक्ष आणि चिन्ह लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यात आले.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या याचिकेवर आता 14 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार Sharad Pawar यांच्या पक्षांनी आव्हान दिले आहे.

या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी रखडली होती. आता दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी एकाच दिवशी 7 ॲागस्ट रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Shivsena
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींनंतर आता आशा सेविकांसाठी 'गुड न्यूज'; देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

सुप्रीम कोर्टाने आता या सुनावणीची तारीख जाहीर केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेच्या दोन्ही सुनावण्या एकापाठोपाठ एक ऐकल्या जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

यापूर्वी या सुनावणीसाठी सप्टेंबर महिन्यातील तारीख देण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणीत दोन्ही प्रकरणे एकदाच ऐकू असे म्हणत 3 ऑगस्ट ही तारीख दिली होती. मात्र शिवसेनेची सुनावणीही 7 ॲागस्ट रोजी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.

आता विधानसभा निवडणूक जवळ आल्याने या याचिकेवरही लवकच सुनावणी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या दोन्ही याचिकांवरील सुनावणीकडे लक्ष आहे.

Shivsena
Electoral Bond : निवडणूक रोख्यांच्या SIT चौकशीवर ‘सुप्रीम’ निकाल; सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com