Sharad Pawar, Uddhav Thackeray, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंची पहिली यादी जाहीर अन् अहिल्यानगरातील स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम!

Shiv Sena (UBT) Releases First List of Candidates : 'या' मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने येण्याची वाढली शक्यता ; जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण?

Pradeep Pendhare

MVA Ahilyanagar Political News : महाविकास आघाडी आणि महायुतीमधील उमेदवारांच्या याद्या आणि नावे जसे समोर येत आहेत तसे, विधानसभेच्या निवडणुकीची वातावरण अधिकच तापू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपल्या पहिल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा आणि श्रीगोंदा मतदारसंघ वगळता, इतर जागांवर उमेदवार दिलेले नाहीत.

विशेष करून अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार दिला नसल्याने 'मविआ'तील स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला, असून ही जागा कोणाला? असा प्रश्न पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाकडे ही जागा गेल्यास या मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराची फाईट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांच्याशी होईल. म्हणजेच, या मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार आमने-सामने येण्याची शक्यता वाढली आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील काही जागांमध्ये अदलाबदली होण्याची संकेत आहेत.

यानुसार अहिल्यानगर शहर मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा जाणार याची उत्सुकता वाढली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये श्रीगोंदा आणि नेवासा मतदार संघातील उमेदवारांची नावे आहेत. परंतु अहिल्यानगर शहर मतदारसंघातील नावे नाही. यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अजून आपली यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे अहिल्यानगर शहर मतदारसंघात नेमकी जागा कुणाला? याचीच चर्चा रंगली आहे.

श्रीगोंदा मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडून पाहिल्यास राष्ट्रवादी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे उभा राहणारा आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले.

त्यामुळे विधानसभेला या मतदारसंघावर शरद पवार यांची पकड राहील, आणि तेच उमेदवार देतील, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जागांच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आला. त्यामुळे आता अहिल्यानगर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जागा जाते की काय, अशीच चर्चा आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अहिल्यानगर शहर मतदारसंघात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बंडखोरीची सर्वाधिक भीती आहे. गेल्या दोन निवडणुका शिवसेनेला यातूनच फटका बसला. यामुळे या मतदारसंघात जागा बदलण्याची वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते झाली.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळा'विरुद्ध 'तुतारी'ची फाईट आहिल्यानगर शहर मतदारसंघात झाल्यास, त्याचे परिणाम वेगळे असतील, असेही सर्वे 'मविआ'तील नेत्यांपर्यंत गेलेत.

त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाने जोर लावला आहे. शरद पवार यांच्या पक्षाची यादी जाहीर होताच अहिल्यानगर शहर मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला याचे देखील चित्र स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीतील शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचे एक दिलाने काम केले. परिणामी नीलेश लंके विजयी झाले.

यातून हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच सोडला जावा याचा आग्रही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 'मविआ'तील नेत्यांकडे लावून धरला. तशा गाठीभेटी घेतल्या. सर्वच पक्षाचे पदाधिकारी ही जागा आपल्यालाच मिळणार, असे दावे करत होते.

परंतु पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचे वर्चस्व पाहून काही जागांची अदलाबदली करण्यात आली आहे. यातूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्या यादीत अहिल्यानगर शहर मतदारसंघातील उमेदवाराचे नाव नसल्याने ही जागा शरद पवार यांच्याकडे देण्यात आला असल्याची चर्चा आहे.

अहिल्यानगर शहर मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांनी उमेदवार दिल्यास 'सामना' रंगेल. परंतु शरद पवार यांच्याकडे उमेदवाराचा चेहरा स्पष्ट नाही. उलट अजितदादा पवार यांच्याकडे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

आमदार संग्राम जगताप यांचा वन-वे प्रचार सुरू आहे. कोणावर टीका-टिप्पणी न करता ते मतदारांपर्यंत पोहचत आहे. आमदार संग्राम जगताप यांना समोर उमेदवार दिसत नसला म्हणून त्यांना प्रचार सोपा वाटत असला, तरी तो तेवढाच अवघड देखील आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्याच धाटणीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT