Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदेंविरोधात उद्धव ठाकरेंचा मोठा डाव!; आनंद दिघेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी

Kopri-Pachpakhadi Assembly constituency: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी मतदासंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असून, 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarakarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांनी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे.

याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुसरी यादी जाहीर केलेली आहे. आता प्रतीक्षा आहे ती महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारी याद्यांची. कारण, यानंतरच राज्यभरातील अनेक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान महाविकास आघाडी(MVA)मधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जरी उमेदवारी यादी जाहीर केलेली नसली, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे मोठा डाव टाकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कारण, एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असून, त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आणि एकनाथ शिंदे हे ज्यांना गुरू मानतात त्या आनंद दिघे यांच्या पुतण्याला म्हणजेच केदार दिघे यांना उमेदवार दिली आहे. प्राप्त माहितीनुसार केदार दिघे यांना एबी फॉर्मही मिळालेला आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shivsena UBT News : शिवबंधन बांधलं, ए बी फॉर्मही दिला अन् ठाकरेंनी के. पी. पाटलांना दिला आदेश; म्हणाले...

यामुळे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील लढत ही एक प्रतिष्ठेची लढत होणार असल्याचं दिसत आहे. या लढतीकडेही सर्वांच्या नजरा राहतील. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर केदार दिघे(Kedar Dighe) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

तेव्हापासून त्यांनी अनेकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांकडून उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षावर होणाऱ्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवाय, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांचा घात झाला असल्याचा दावाही खोडून काढलेला आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Deglur-Biloli Assembly Constituency : पाचवेळा शिवसेना, एकदा भाजप अन् `आता परिवर्तन महाशक्ती`, साबणेंची तडजोड ?

प्राप्त माहितीनुसार केदार दिघे यांना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्याविरोधातच कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे.तर माजी खासदार राजन विचारे यांना ठाणे शहरामधून उमेदवारी दिली गेली आहे. एकनाथ शिंदे हे 28 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com