Shubhangi Patil & Gajendra Ampalkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shubhangi Patil Politics: शुभांगी पाटील यांचा आरोप, ‘भाजप नेते नाव रामाचे घेते, काम रावणाचे करतात’

Shivsena UBT Vs BJP dispute in Dhule, Corporation Removes Hawkers in city, BJP leader threatens Shivsena Female leader-जिल्हा पोलिस प्रमुखांसमोरच भाजपचे गजेंद्र अंपळकर यांनी शिवसेनेच्या शुभांगी पाटील यांना धमकावल्याने धुळ्यात वाद पेटला.

Sampat Devgire

Shubhangi Patil News: धुळे शहरातील भाजी विक्रेत्यांना हटविल्याने यावरून वाद रंगला आहे. भाजपने त्याचे समर्थन केले आहे. मात्र हॉकर्ससह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्या विरोधात मैदानात उतरल्याने राजकारण तापले आहे.

धुळे शहरातील आग्रा महामार्गावरील भाजी विक्रेते आणि हॉकर्स महापालिकेने हटविले. त्या विरोधात भाजी विक्रेच्यांनी आंदोलन करीत धरणे धरले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात झालेली बैठक सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरली. या नेत्यांमध्ये अक्षरशः अंगावर धाऊन जात अपशब्दांचा वापर झाला. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा पोलिस प्रमुख, भाजपचे आमदार अनुप अग्रवाल यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांनी भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी केली. त्यावरून भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी श्रीमती पाटील यांच्या पतीवर धाऊन गेले. त्यांच्यात बाचाबाची झाल्याने बैठकीत वातावरण तापले.

याचवेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी शिवसेनेच्या नेत्या पाटील यांना उद्देशून सर्व विक्रेत्यांना तुमच्या घरासमोर जागा द्या, असे सांगत त्यांना धमकावले, असा आरोप श्रीमती पाटील यांनी केला. यावरून उपस्थितांतील दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

त्यानंतर खासदार डॉ. बच्छाव यांसह उपस्थित नेत्यांनी त्यात हस्तक्षेप केला. पोलिस अधिकाऱ्यांनीही नेत्यांना शांततेचे आवाहन केले. श्रीमती शुभांगी पाटील पोलिसांत तक्रार देण्यास गेल्या असता, पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही.

या प्रश्नावरून हॉकर्स आणि भाजी विक्रेत्यांनी आंदोलन केले. त्यात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील सहभागी झाल्या. भारतीय जनता पक्षाचे लोक दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, तर पोलिस बघ्याची भूमिका घेतात.

एकंदरच हि स्थिती म्हणजे, भाजपचे नेते नाव रामाचे घेतात, काम मात्र रावणाचे करतात. रावणाने साधूचे रूप घेतले होते. भाजप निवडणूक आयोगाच्या आडून सत्ता हस्तगत करतो, अशी टीका श्रीमती पाटील यांनी केली.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT