Shivsena MLA Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन

महावितरण अभियंता व कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार सुहास कांदे यांनी सूचना केल्या.

Sampat Devgire

नांदगाव : मुळातच तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे अतिवृष्टीनंतर रब्बीचे आव्हान उभे आहे. त्यातच धुक्याच्या वातावरणात पिके जगविण्यासाठी महावितरणने सक्ती व सावकारशाही पद्धतीने वसुलीचे धोरण अवलंबविण्याऐवजी पंधरा दिवस आधी पूर्वसूचना द्याव्यात, अन्यथा शिवसेना (Shivsena) स्टाईल आंदोलन केले जाईल, अशा शब्दात आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

येथील विश्रमगृहावर महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार कांदे यांनी सध्या महावितरणकडून होणाऱ्या वसुली कामाचा आढावा जाणून घेतला. महावितरणच्या वसुलीला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना फक्त जोडण्या खंडित करण्यापूर्वी आगाऊ सूचना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ज्या भागात थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांच्या शिवारातील रोहित्रावरील वीज जोडण्या खंडित करण्यापूर्वी बिल भरण्यासाठीच्या नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना दिल्या जात नसल्याचे प्रकार वाढले आहे.

या प्रकारावर आमदार कांदे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेत आमदार कांदे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, अन्य अभियंता, ठिकठिकाणचे लाईनमन, वायरमन यांची बैठकी घेतली. त्यात रोहित्र नादुरुस्तीचे वाढलेले प्रमाण, त्यासाठी जमा करण्यात येणाऱ्या पैशांबाबत बैठकीत काही शेतकऱ्यांनी आमदारांच्या पुढ्यात तक्रारींचा पाढा वाचला.

मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासेवजा बचाव करण्यात आला. कर्मचाऱ्यांना उदभवणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला अवगत नक्की करावे. मात्र, राजकारण करू नका असा सज्जड इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना देताना तुमच्या अडचणी मी सोडविण्यास तयार आहे. परंतु, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न यापुढे झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही आमदार कांदे यांनी दिला.

या वेळी मनमाड विभागीय कार्यकारी अभियंता संजय तडवी, उप कार्यकारी अभियंता वाटपाडे, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, विष्णू निकम, श्रीकांत परदेशी, बाळासाहेब आव्हाड, सुनील जाधव, सागर हिरे, लाईनमन, वायरमन उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT