Baban Gholap, Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना नाशिकला एकहाती सत्ता घेईल...त्यासाठी बूथप्रमुखांनी सर्वस्व पणास लावावे!

महापालिका निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नाशिक रोड येथे शिवसेना बुथप्रमुख मेळावा झाला.

Sampat Devgire

नाशिक : महानगरात शिवसेनेने सक्षम बूथ यंत्रणा उभारली असून सर्व बूथ प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीची माहिती देण्यात आली आहे. बूथप्रमुख हा पक्षाचा आत्मा असतो, हे लक्षात घ्या आणि आगामी महापालिका निवडणुकांत पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यास आपले सर्वस्व पणास लावा, असे आवाहन शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप (Shivsena deputy leader Baban Gholap) यांनी केले.

नाशिक रोड परिसरातील बूथप्रमुखांचे चार मेळावे झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. घोलप बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, सुनील बागूल, खासदार हेमंत गोडसे उपस्थित होते.

यावेळी श्री. घोलप म्हणाले, इतर कोणत्याही पक्षांच्या तुलनेत शिवसेनेच्या बूथप्रमुखांचे काम वाखाणण्याजोगे आहे. त्यांना आता आणखी जोमाने कामाला लागून जनसंपर्क वाढवावा लागेल.जनतेत मिसळा. त्यांच्या दुःखात सामील व्हा.त्यांची कामे करा.आपणास यावेळी महापालिकेत परिवर्तन घडवायचे आहे आणि त्यामुळेच जनतेचे आशीर्वादच पक्षासाठी मोलाचे राहतील हे लक्षात ठेवा.

नाशिक रोड परिसरात बूथप्रमुखांची सक्षम बांधणी झाली असून ते कोणतेही आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आपल्या भाषणात नमूद केले. माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल आणि खासदार गोडसे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. पक्ष सोपवेल ती जबाबदारी पार पाडण्यास आम्ही सज्ज असून शिवसेनेचे १०० प्लसचे स्वप्न आम्ही साकार करणारच असा विश्वास शाखाप्रमुखांनी यावेळी व्यक्त केली.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT