Rajabhau Waje
Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या १४ नगरसेवकांची शिवसंपर्क अभियानाला दांडी!

Sampat Devgire

सिन्नर : आगामी जिल्हा परिषद, (ZP) पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (Shivsena) शिवसंपर्क मोहीम सध्या सुरु आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधनीवर भर दिला जात आहे. मात्र येथे (Nashik) झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या नगरसेवकांनीच या कार्यक्रमाला दांडी मारली. शिवसंपर्क अभियानात पक्षाचे नगरपालिकेत १८ नगरसेवक असून या कार्यक्रमास चार नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेला धोक्याचा इशारा तर नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला आहे. (Shivsena taken party workers meeting in Sinner)

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गजानन चव्हाण यांनी ही मरगळ झटकून काढा असे सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये ८० टक्के शिवसेनेचे उमेदवार निवडून आले तरच २०२४ चा सिन्नर तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचा राहील, त्यादृष्टीने तयारीला लागा अशा सूचना आमदार गजानन चव्हाण यांनी शिवसंपर्क अभियानात शिवसैनिकांना केल्या.

येथील शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात शिवसंपर्क अभियानाप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे, उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, सोमनाथ तुपे, संजय सानप, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गाडे, कल्पना रेवगडे, नगरसेवक गणेश सानप, राहुल ताजनपुरे, समीर बोडके, गौरव घरटे, पीराजी पवार आदी उपस्थित होते

श्री. चव्हाण म्हणाले, राजाभाऊ वाजे यांचा पराभव २०६७ मतांनी झाला तो झाला नसता, परंतु या मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेतल्या जातात, त्या वेळेस त्या घेतल्या असत्या तर पराभव झाला नसता. अधिकाऱ्यांनी शिवसेना सैनिकांचा रुद्रावतार पाहिला असता तर वेळेसच १४ हजार बोगस मतदार कमी झाले असते व शिवसेनेचाच आमदार झाला असता. माजी आमदार वाजे यांनी दुसऱ्यास नेहमी पराभवाच्या दोष न देता आपल्यातील चुका शोधला पाहिजे असे ते म्हणाले. यश आले तर वाटेकरी सगळेच असतात, परंतु पराभव झाला तर वाटेकरी कोणीच नसतात. शेवटच्या माणसापर्यंत आपण कसे पोहोचू हे पाहिले असे चव्हाण यांनी सांगितले.

उदय सांगळे, नगरसेवक गणेश सानप, राहुल ताजनपुरे, ज्ञानेश्वर गोडे आदींनी आगामी निवडणुका संदर्भात मनोगत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष किरण डगळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘संघर्षातून भगवा फडकेन’

पाच वर्षात केलेल्या कामाचे फलक हे गावोगावी लावले असते तर मतदारांमध्ये शिवसेना या पक्षाविषयी आत्मीयता तयार झाली असती व चांगल्या मतांनी उमेदवार विजय झाला असता. जो नगरसेवक आमदार लोकांच्या हृदयात घर करतो तो नेहमीच जिंकून येतो. पाच वर्षात वाजे यांनी मतदार संघात प्रचंड कामे केली पण त्याची कुठलीही जाहिरात केली नाही, त्यामुळे मतदारांमध्ये कामे दिसली नाहीत. शिवसैनिकांनी संघर्षाला तयार राहिले पाहिजे.असे चव्हाण यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT