Shrirampur farmer protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shrirampur farmer protest : पाणीप्रश्न पेटला! तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा गोदावरीत उडी घेण्याचा प्रयत्न

A farmer attempted jump into Godavari River during protest Shrirampur over demands fill three KT dams to 50% capacity : नागमठाण पुलावर आंदोलनादरम्यान घडला प्रकार; केटी बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी.

Pradeep Pendhare

Godavari River water demand : पाणीप्रश्नावर आक्रमक झालेल्या शेतकऱ्याने तहसीलदारासमोरच, गोदावरी नदी पात्रात उडी घेण्याचा प्रयत्न केला. श्रीरामपूर तालुक्यातील नागमठाण येथील पुलावर ही घटना घडली.

तहसीलदार मिलिंद वाघ यांच्यासमोर ही घटना घडली. महाकाळवाडगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोगरे यांनी हा प्रकार केला. इतरांनी वेळीच त्यांना पकडल्याने, पुढचा मोठा अनर्थ टळला.

गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांनी (Farmer) नागमठण येथील पुलावर आंदोलन केले. या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तहसीलदार मिलिंद वाघ पोहोचले होते. पाणी प्रश्नावर ठोस निर्णय होत नसल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहेत.

गोदावरील नदीवरील वांजरगाव, खानापूर आणि कमळपू येथील केटी बंधारे किमान 50 टक्के भरून द्यावेत, अशी आंदोलनाची प्रमुख मागणी होती. बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यास पिण्याचा पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा (Water Issue) प्रश्न सुटणार असल्याचा दावा आंदोलक शेतकऱ्यांचा आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांशी गुरूवारी चर्चा केली होती. श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ, नाशिक व अहिल्यानगर पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनीही आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकर्‍यांमध्ये नाराजी कायम आहे.

वैजापूर आणि श्रीरामपूर तालुक्यांतील सुमारे 100 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यांशी संबंधित आहे, असा दावा शेतकरी संघटनेने केले आहे. नांदूर-मधमेश्वर येथून पाणी सोडण्यात आले असतानाही संबंधित बंधाऱ्यांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पाणी पोहोचले नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

पाणी सोडल्याचा तारखा, पाण्याचे प्रमाण, कालावधी आणि बंधाऱ्यांपर्यंत पाणी न पोहोचण्याची कारणे यांची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेने मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT