Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदेंचा मंत्री विखे पाटलांना अप्रत्यक्ष टोला; जिल्हा बँकेच्या बिनविरोधावरून नवा पेच?

Ram Shinde questions hurdles unopposed Ahilyanagar DCC Bank election, indirectly targeting Radhakrishna Vikhe Patil calls Yashwantrao Gadakh intervene. Meeting with Nilesh Lanke adds new political dimension : नीलेश लंके यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा; बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गडाखांनी पुढाकार घ्यावा, असे शिंदेंचे आवाहन.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar bank election unopposed : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या बिनविरोधासाठी काहींकडून अडसर निर्माण केले जात आहेत. त्या कोण करत आहेत, त्याचा शोध घेण्याची गरज आहे, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नाव न घेता लगावताना, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी बँक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री विखे पाटील यांनी सुरूवातीला चर्चा केली होती. त्यानंतर कुठलाही संपर्क नाही, असेही प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांची काल शासकीय विश्रामगृहावर भेट झाली. या दोघा नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. बँकेसाठी इच्छुक उमेदवार देखील उपस्थित होते. राम शिंदे यांनी माघार घेताना, कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे लंके अन् शिंदे यांच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक (DCC Bank) बिनविरोध व्हावी, यासाठी काहींचा अडसर आहे. अडचणी निर्माण केल्या जात आहेत. या अडचणी निर्माण करणाऱ्याचा शोध घेतला पाहिजे, असे सांगताना राम शिंदे यांचा मंत्री विखे पाटील यांच्याकडे रोख दिसत होता. याचवेळी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना बिनविरोधासाठी आवाहन केले. गडाखांनी सर्वप्रथम बँक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले होते. आता त्यांनी वडीलकीच्या नात्याने पुढाकार घेऊन, नेतृत्वाला तसे सांगण्याची गरज आहे. कारण आता उमेदवारी मागे घेण्यास अवघे चार दिवस उरले आहेत, याकडे शिंदेंनी लक्ष वेधले.

Ram Shinde
Ahilyanagar DCC Bank Election : राम शिंदे अन् नीलेश लंकेंची बंद दाराआड चर्चा; अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत काय घडणार?

राम शिंदे म्हणाले, "बँकेसाठी काहींनी प्रचार सुरू केला आहे. तालुकानिहाय सेवा संघातील सात उमेदवार वगळता इतर इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे निवडणूक होणार असे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांना एकत्र घेतले असते, तर 200 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आले नसते."

Ram Shinde
Sujay Vikhe Patil News : सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीवर सोमवारी फैसला? उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

खासदार नीलेश लंके यांनी भेट घेऊन बँकेविषयी चिंता व्यक्त करताना, शेतकऱ्यांच्या बँकेसाठी शेवटपर्यंत नेतृत्वाबरोबर आहोत, असे सांगितले. माजी खासदार सदाशिव लोखंडे देखील बैठकीला येणार होते. यावरून दिसते की, बँकेच्या हितासाठीच सर्वजण लढत आहेत. परंतु बिनविरोध निवडणूक होण्यामधील अडचणी शोधण्याची आवश्यकता आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी माझा नेहमीच पुढाकार राहील. परंतु काहींचे मनसुबे वेगळे दिसत आहे. यातही प्रस्ताव आल्यास निवडणूक बिनविरोध करण्यास पुढाकार घेऊ, असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com