Anuradha Adik Claims NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti formula : राष्ट्रवादीने फॉर्मुल्याची आठवण करून दिली; महायुतीतील मित्र पक्षांचा थयथयाट!

Anuradha Adik Claims NCP Ticket for Shrirampur President Post : श्रीरामपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्याची आठवण अनुराधा आदिक यांनी करून दिली.

Pradeep Pendhare

Shrirampur Nagarparishad Election : विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये विद्यमान आमदारांविरोधात मित्रपक्षाकडून उमेदवार न देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. राज्यात अनेक ठिकाणी हा फॉर्म्युला लागू झाला. आता नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे.

श्रीरामपूर इथं महायुतीकडून अनुराधा आदिक नगराध्यक्षा होत्या. त्यानुसार महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी विचार व्हावा, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली. यावर प्राधान्याने तोडगा काढण्याचे सुचवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक उद्या (ता. 9) पत्रकार परिषद घेऊन अधिकृत मत व्यक्त करणार आहेत.

मुंबईत अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठकीत नगरपालिका आणि नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा जवळपास निर्धार झाला. पक्ष नेतृत्वाचा हाच संदेश घेऊन स्थानिक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी घेऊन आपापल्या बालेकिल्ल्यात स्वबळाच्या तयारीत उतरले आहे. श्रीरामपूरमधील माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी महायुतीकडून आपल्याच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगून, पुन्हा निवडणुकीचे मैदान गाठलं आहे. असं असलं, तरी महायुती होईल की नाही, अशा सर्व शक्यता गृहीत धरूनच अनुराधा आदिक यांनी निवडणुकीची तयारी केल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगत आहेत.

श्रीरामपूरमध्ये महायुतीकडून (Mahayuti) नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची दिवसांगणित संख्या वाढू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सहा जणांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. यात भाजपमधून नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले, प्रकाश चित्ते यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानली जात आहे. यातच आता महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे.

अनुराधा आदिक या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुरूवातीला चर्चा होती. परंतु भाजप माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना, याबाबत कल्पना नसल्याचे सांगून, चर्चांना पूर्णविराम दिला. यातच अनुराधा आदिक यांनी त्याचवेळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला हजेरी लावत, आपण अजितदादांबरोबर असल्याचा सूचक संकेत दिले. त

अजितदादांच्या राष्ट्रवादीची महायुतीसोबत जोरदार तयारी सुरू असून, नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदांसाठी पक्ष पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक, प्रदेश सदस्य सुनील थोरात, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा आणि शहराध्यक्षा अर्चना पानसरे यांनी दिली.

राष्ट्रवादीचा विश्वास

मागील निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून अनुराधा आदिक यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला होता. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये आजही त्यांचा चांगला प्रभाव आहे. राज्यात महायुतीचे सरकार कार्यरत असून, सरकारच्या योजनांमुळे निर्माण झालेल्या जनतेच्या विश्वासाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेची निवडणूकही महायुतीकडून संयुक्तरीत्या लढवली जावू शकते, अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळगून आहेत.

महायुतीत जागा वाटपाच्या चर्चा

नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा अनुराधा आदिक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, अशी आशा राष्ट्रवादीला आहे. महायुतीत घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच होईल. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अधिकृत भूमिका उद्या (ता.9) पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.

महायुतीचा फॉर्म्युला

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार संबंधित नगरपालिकेत ज्या पक्षाचा विद्यमान नगराध्यक्ष असेल, त्या पक्षाचा उमेदवार पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा आदिक नगराध्यक्षा असल्याने, महायुतीकडून उमेदवारी त्यांनाच मिळावी, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. या दाव्यानुसार महायुतीत अधिकच धुसफूस वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT