Eknath Shinde Shivsena : प्रकाश चित्तेंची वाट बिकट; नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेत वाढत्या इच्छुकांमुळे कोंडी

Shrirampur Shivsena Mayor Race Trouble for Prakash Chitte : माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मुलाखती झाल्या.
Eknath Shinde Shivsena
Eknath Shinde ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Nagarparishad mayor post : अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर सध्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदु ठरलं असून, नगरपरिषदेसाठी महायुती होणार की नाही, अशी राजकीय परिस्थितीवर आहे. भाजपचा 35 वर्षांचा घरोबा सोडून, थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा एकनाथ शिंदेंकडून शब्द घेतला.

परंतु माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीत प्रकाश चित्ते यांना धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदासाठी तब्बल सहा दिग्गज भिडूंनी मुलाखती दिल्याने प्रकाश चित्तेंची वाट बिकट होणार असे संकेत आहे. या कोंडीतून प्रकाश चित्ते कशी वाट काढतात, याकडे लक्ष लागलं आहे.

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या म्हाडा इथल्या कार्यालयात जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदासह नगरसेवक इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

या बैठकीस शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नेते प्रकाश चित्ते, सागर बेग, संजय छल्लारे, अरुण पाटील, नाना पाटील, नीरज मुरकूटे, शहरप्रमुख उमेश पवार आदींची उपस्थिती होती. मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या.

Eknath Shinde Shivsena
Farmer Loan Waiver Maharashtra : शेतकऱ्यांनो, अजून सात महिने वाट बघा; कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची तारीख, पण दूरची!

नगराध्यक्षपदासाठी प्रकाश चित्ते, मंजूष्री मुरकूटे, सागर बेग, संजय छल्लारे, सुभाष जंगले आणि पौर्णिमा राजेंद्र देवकर या सहा दिग्गज इच्छुकांनी दावेदारी दाखवली. या सर्वांची नावे जिल्हा नेतृत्वाकडून वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणार असून, पक्षाचे वरिष्ठ नेते अंतिम उमेदवार निश्चित करणार आहेत.

Eknath Shinde Shivsena
Maharashtra Congress News: मोठी बातमी! 'होय, दुबार मतदारयादीत माझं नाव...'; काँग्रेस नेत्याचा धक्कादायक खुलासा

श्रीरामूपर शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता असून, नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवाराचा विचारही सुरू आहे. त्यामुळे या स्पर्धेला अधिक रंग चढला आहे. पक्षांतर्गत गटबाजी टाळून सर्वसमावेशक उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न नेतृत्वाकडून सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान, प्रकाश चित्ते यांनी नगराध्यक्षपदाच्या हेतूनेच शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या त्यांच्या टीकेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या उद्घाटनावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चित्ते यांच्या निवासस्थानी दिलेली भेट, स्थानिक राजकारणात नवी चर्चा रंगवणारी ठरली आहे.

आता पक्षांतर्गत वाढत्या इच्छुकांवर वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजप आणि काँग्रेसकडूनही प्राथमिक हालचाली सुरू झाल्याने श्रीरामपूरच्या राजकीय तापमानात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com