Food safety officials inspect suspected adulterated milk during a crackdown in Sinnar taluka, Nashik district. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sinner Milk Politics : धक्कादायक! दूध सम्राटाच्या तालुक्यातच भेसळीचा गोरख धंदा; हजारो लिटर भेसळीचा संशय?

Sinnar Milk Adulteration Case : दुधाचे राजकारण करणाऱ्या सिन्नर तालुक्यात भेसाळीचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल होऊनही पोलीस निष्क्रिय असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

Sampat Devgire

Sinnar Milk Adulteration News: सिन्नरच्या दूध संकलनात मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्या होत्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी थेट वरिष्ठ पातळीवरू कारवाई झाली. त्यात लाखो रुपयांचे दूध भेसळचे साहित्य जप्त झाले आहे. या संदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात प्रशांत रोहिदास काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. १७ लाखांचे आठ हजार तीनशे किलो भेसळीचे साहित्य जप्त झाले. मात्र अद्याप भेसळ करणाऱ्याला पोलिसांनी अटक न केल्याने तो चर्चेचा विषय आहे.

सिन्नर तालुक्याचे नेतृत्व दूध संकलन आणि प्रक्रिया केंद्राची मालकी असलेल्या नेत्याकडे आहे. तालुक्यात तीनशे संकलन केंद्र आहे. मात्र नियमानुसार ग्रामपंचायतीकडे नोंदणी करणारे अवखे 14 केंद्र आहे तो. त्यामुळे दूध भेसळीचा गोरख धंदा किती केंद्रांच्या माध्यमातून चालतो? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने भेसळीवर कारवाई करून तीन केंद्रांवर धाडी टाकल्या. त्यानंतर धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तालुक्यातील दूध संकलन २७ हजार १४६ लिटरने घटले आहे. त्यामुळे तालुक्यात किती मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ सुरू होती, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दूध भेसळी बाबत अन्न व औषध प्रशासनाकडे यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. प्रत्येक दूध संकलन केंद्राने आपल्याकडे किती शेतकरी व किती दूध संकलित होते याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष परिपत्रक काढले आहे. मात्र त्याचे पालन मोजक्या 14 संस्थाच करीत असल्याचे उघड झाले आहे.

सध्या भेसळी विरोधात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. मात्र दूध भेसळीसह सर्व गैरप्रकार यापूर्वीही सुरूच होते. प्रशासन त्याविषयी उदासीन का होते? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सिन्नरमध्ये राजरोसपणे दूध भेसळ सुरू होती हे आता उघड झाले आहे. पोलीस अध्यापही गुन्हा दाखल असूनही संशयीताला हात लावू शकलेले नाही. त्यामुळे यामध्ये कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे की पोलीस या भेसळीला संरक्षण देत आहेत, असा संशय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT