Vijay Karanjkar
Vijay Karanjkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

किती आले, किती संपले, शिवसेना आहे तिथेच आहे!

Sampat Devgire

नाशिक : शिवसेना (Shivsena) ही हिदुत्व व मराठी मानसाच्या न्याय्य हक्कासाठी वाहणारी खळाळती पवित्र नदी आहे. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thakre) श्वास आहे. त्यामुळे बंडाने आमदारांनी काय साधले हे भविष्यात समजेल. किती आले, किती गेले, मात्र शिवसेना यापुढेही अशीच उभी राहील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी व्यक्त केला. (shivsena Rebel MLAs shall rethink there move)

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी कृषिमंत्री दादा भुसे हेही गुवाहाटीत बंडखोराच्या गटात दाखल झाले. जिल्ह्यात शिंदेंसोबत गेल्याची संख्या दोन झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बंडखोर इच्छुकांच्या समर्थकांना मंत्रिपदाची आस आहे. तसे झाल्यास, मात्र ग्रामीण शिवसेनेतील अनेक गटांत त्याचा परिणाम शक्य होणार आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी मात्र संघटना आहे तेथेच होती, तेथेच राहील, असे स्पष्ट करीत, परिणाम होणार नसल्याचा दावा केला.

बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दादा भुसे हे जुने सहकारी आहेत. दिवंगत शिवसेनेचे नेते आनंद दिघे हेच दोघांना जोडणारा प्रमुख दुवा असल्याने जुन्या तालमीत तयार झाले असल्याने पहिल्या दिवशी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांच्या फोटोत श्री. भुसे दिसले नाहीत याचेच त्यांच्या समकालीन शिवसेनेतील जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांत खासगीत बोलताना आश्चर्य व्यक्त होत आहे.

मालेगाव-ठाणे कनेक्शन

श्री. भुसे हेही गुरुवारी गुवाहाटीला रवाना झाले. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मालेगावचे राजकारण पूर्वीच्या दाभाडी व मालेगाव बाह्य मतदारसंघाशी संलग्न आहे. त्यांनी मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीसाठी आवश्यक नऊ प्रमुख पदाधिकारी कायम जोडून ठेवले आहेत. त्या समर्थकांनी गुरुवारी दिवसभर श्री. भुसे यांच्या रवानगीनंतरच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेतला. त्यामुळे भुसे यांच्या जाण्याने मालेगाव मतदारसंघातील काही गटांतील राजकारणावर निश्चितच परिणाम होणार आहे. दिवंगत आनंद दिघे यांच्यापासून श्री. भुसे आणि शिंदे यांच्यातील ठाण्यातील शिवसेनेशी जुने घनिष्ठ संबंध राहिले आहेत. ठाण्यातील बुरुजात श्री. भुसे यांचे आसन भक्कम असण्याला इतरही अनेक कंगोरे आहेत. त्यामुळेच त्यांच्या शिंदेंसोबत जाण्याचा मालेगावच्या शिवसेनेच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या जोरावर निवडून आलेले फुटतात. बंडखोरी करतात. मात्र शाखाप्रमुख, गट, गण, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुखांपर्यंतचे संघटनात्मक पदाधिकारी मात्र पक्षाशी एकनिष्ठ आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी ही संघटना आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. किती आले, किती संपले, शिवसेना आहे तिथेच आहे.

-विजय करंजकर, जिल्हाप्रमुख, नाशिक

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT