शहा निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची सरशी

शहा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी बाजी मारली.
Newly Elected Directors of Shaha Society
Newly Elected Directors of Shaha SocietySarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : येथील (Sinner) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) गटाने एकहाती सत्ता मिळवली. विरोधी शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje)गटांचा पराभव झाला. वाजे गटाला एकही जागा न मिळाल्याने आगामी निवडणुकीसाठी हा निकाल त्यांना अडचणीचा ठरणार आहे. (Shaha cooperative society election was important for upcoming elections)

Newly Elected Directors of Shaha Society
नॅाट रिचेबल भास्कर जाधव गुवाहटीच्या मार्गावर?

शहा विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या श्री कालभैरवनाथ पॅनलने १२ जागांवर यश मिळवत विरोधी गटांचा पराभव केला. वाजे समर्थक लोकविकास पॅनलचे बाळू जाधव बिनविरोध निवडून आले होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Newly Elected Directors of Shaha Society
Eknath Shinde : अखेर कृषीमंत्री दादा भुसे एकनाथ शिंदे गटात दाखल!

ही निवडणूक आगामी ग्रामपंचायत तसेच जिल्हा बँके संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी महत्वाची होती. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांना बळ दिले होते. यामध्ये श्री कालभैरवनाथ पॅनलने बारा जागा जिंकल्या. त्यामुळे हा निकाल शिवसेनेचे नेते वाजे यांच्या समर्थकांसाठी आगामी निवडणुकांसाठी सावध करणारा आहे.

लोकविकास पॅनलचा झालेला पराभव आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला घातक ठरण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीतील तीन उमेदवारांपैकी दोघांची माघार झाल्याने लोकविकास पॅनलचे बाळू जाधव बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १२ जागांवर निवडणूक झाली.

निवडणुकीतील विजयी उमेदवार असे, दगू अदिक (३७७ मते), रामनारायण कलंत्री (५२२), आबासाहेब जाधव (४३६), अण्णासाहेब जाधव (४०३), बाळू जाधव (४४५), नवनाथ जाधव (४८०), श्याम मस्के (३६५), नवनाथ वाकचौरे ३८६ मते, सुवर्णा लोखंडे (३७३), अरुणा सोनवणे (४०२), हर्षदा जाधव (४५२), विद्यमान अध्यक्ष संजय गोराणे (४१९).

सभासदांनी सत्ताधारी गटाच्या हातात सत्ता देऊन कामाची पावती दिली आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा न देता आमदार माणिकराव कोकाटे याच्या मार्गदर्शशाखाली याहीपुढे सभासदांच्या हिताचे काम करू.

आबासाहेब जाधव, माजी अध्यक्ष.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com